Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलिसांच्या मोहल्ला कमिटी ग्रुपमध्ये हॅकरची घुसखोरी: API फाईल क्लिक करताच पोलिसाची साडेसात लाखांची फसवणूक
गुन्हेगारी

पोलिसांच्या मोहल्ला कमिटी ग्रुपमध्ये हॅकरची घुसखोरी: API फाईल क्लिक करताच पोलिसाची साडेसात लाखांची फसवणूक

अवघ्या १२ मिनिटांत खात्यातून ४ लाख ९९ हजार रुपये, आणि त्यानंतरच्या मिनिटात आणखी २ लाख ५५ हजार रुपये दुसऱ्या खात्यात वर्ग झाले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/07/2025Updated:30/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

मुंबई, विशेष प्रतिनिधी:

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थापन केलेल्या ट्रॉम्बे पोलिसांच्या मोहल्ला कमिटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एका हॅकरने प्रवेश करत एपीके (APK) फाईल शेअर केली. या फाईलवर क्लिक करताच एका पोलीस कर्मचाऱ्याला तब्बल साडेसात लाख रुपयांना फसवणुकीचा फटका बसला आहे. सायबर भामट्याने त्यांच्या नावाने कर्ज काढून ती रक्कम दुसऱ्या खात्यात वळवली आहे. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस आणि सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत राहणारे एक पोलीस शिपाई सप्टेंबर २०२४ पासून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी पोलीस अधिकारी, अंमलदार आणि परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींचा ‘मोहल्ला कमिटी ट्रॉम्बे’ नावाचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे.

या ग्रुपमध्ये २२ जुलै रोजी दुपारी ‘आरटीओ चलन’ नावाची एक एपीके फाईल आली. तक्रारदार असलेल्या पोलीस शिपायाने त्या फाईलमध्ये काय आहे हे पाहण्यासाठी त्यावर क्लिक केले. मात्र, काहीच उघडले नाही. पण, त्याच वेळी सायबर ठगांना त्यांच्या मोबाईलचा ॲक्सेस मिळाला. काही वेळातच त्यांच्या मोबाईल नंबरवर आर्थिक व्यवहारांचे मेसेज येऊ लागले. सायंकाळी सहा वाजता त्यांच्या बँक खात्यात ७.५८ लाख रुपये जमा झाल्याचा संदेश आला. विशेष म्हणजे, अवघ्या १२ मिनिटांत खात्यातून ४ लाख ९९ हजार रुपये, आणि त्यानंतरच्या मिनिटात आणखी २ लाख ५५ हजार रुपये दुसऱ्या खात्यात वर्ग झाले.

आपली सायबर फसवणूक झाल्याची खात्री पटताच पोलीस शिपायाने तात्काळ सायबर क्राईम हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे त्यांना लगेच तक्रार नोंदवता आली नाही. त्यानंतर त्यांनी पुन्हा तक्रार नोंदवली.

फसवणूक कशी झाली?

सायबर भामट्याने एपीके फाईलद्वारे मोबाईलचा ताबा मिळवला. त्यानंतर त्यांनी बनावट कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स तयार करून बँकेत सादर केली. यामुळे त्यांना पर्सनल लोन मंजूर झाले आणि ती रक्कम त्यांनी अन्य खात्यात वर्ग केली, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 589
सायबर क्राईम
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- वैद्यकीय क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे एक अत्यंत प्रभावी माध्यम…

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.