Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

August 5, 2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

August 5, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या नव्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकरांच्या जागी कोण? तटकरे यांनी केली या नावाची घोषणा

August 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार सत्यजीत तांबे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, हे कारण आले समोर
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, हे कारण आले समोर

तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने 28 जुलै 2025 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना लागू करण्याची घोषणा केली होती.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 2, 2025Updated:August 2, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, विशेष प्रतिनिधी:

मालमत्ता करावरील शास्ती माफीसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या अभय योजनेच्या अंमलबजावणीत निर्माण होत असलेल्या तांत्रिक अडचणींबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शुक्रवारी घेतलेल्या या भेटीत त्यांनी योजनेचा लाभ राज्यातील नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना वेळेत मिळत नसल्याचे त्यांनी शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले आणि प्रणालीतील तांत्रिक त्रुटी तात्काळ दूर करण्याची मागणी केली.

योजनेच्या अंमलबजावणीत नेमके काय अडथळे?

राज्य सरकारने 50% शास्ती माफीसाठी अनेक नगरपरिषदांना परवानगी दिली आहे. संगमनेर नगरपरिषदेला 28 जुलै 2025 रोजी परवानगी मिळाल्यानंतरही IWBP सॉफ्टवेअर प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे ही योजना प्रभावीपणे लागू करता येत नाहीये. या अडचणींमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. प्रामुख्याने खालील समस्या येत आहेत:

* विलंब: एकरकमी समायोजनाची सुविधा नसल्यामुळे एका नागरिकाच्या नोंदीसाठी सुमारे दीड तास लागत आहे. यामुळे कामाला प्रचंड विलंब होत आहे.

* दुरुस्तीचा अभाव: लाभार्थीने बिल भरले नाही, तर पूर्वी केलेल्या नोंदी मागे घेता येत नाहीत. त्यामुळे चुका सुधारणे शक्य होत नाही.

* पर्यवेक्षणाचा अभाव: लिपिकांनी केलेल्या नोंदी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासल्या जात नाहीत. त्यामुळे झालेल्या चुका कायम राहतात आणि त्या सुधारता येत नाहीत.

आमदार तांबे यांनी या सर्व बाबींवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे. नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना या योजनेचा खरा लाभ मिळावा यासाठी IWBP प्रणालीतील ही तांत्रिक अडचण तातडीने दूर करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.मागणीच्या अनुषंगाने आमदार तांबे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिलेले पत्र.

‘अभय योजना’ लागू होण्यामागेही आमदार तांबेंचाच पाठपुरावा

‘अभय योजना’ लागू होण्यामागेही आमदार तांबे यांचा मोठा हातभार आहे. 2024 च्या हिवाळी अधिवेशनात आणि 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी ही मागणी वारंवार मांडली होती. संगमनेरमधील हजारो नागरिकांवर लावण्यात आलेल्या शास्तीमुळे निर्माण झालेली अडचण त्यांनी प्रभावीपणे सरकारसमोर मांडली. त्यांच्या याच पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने 28 जुलै 2025 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना लागू करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता या योजनेच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्यासाठीही तेच पुढाकार घेत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,533
अभय योजना एकनाथ शिंदे सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या नव्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकरांच्या जागी कोण? तटकरे यांनी केली या नावाची घोषणा

August 5, 2026

संगमनेरमध्ये कथित पाकिस्तानी ‘ग्लोरी’ क्रीम विक्रीप्रकरणी शिवसेना आक्रमक; तपासात दिरंगाई झाल्यास करणार ‘असे काही’!

August 4, 2026

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

August 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पत्रकारिता

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

By अनंत पांगारकरAugust 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अनंत पांगारकर | संगमनेर  सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संगमनेर नगर परिषदेच्या…

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

August 5, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या नव्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकरांच्या जागी कोण? तटकरे यांनी केली या नावाची घोषणा

August 5, 2026

बुधवार, ०५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.