Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

August 5, 2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

August 5, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या नव्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकरांच्या जागी कोण? तटकरे यांनी केली या नावाची घोषणा

August 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महसूलमंत्र्यांनी संगमनेरच्या जमिनीप्रश्नी अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे मागविले, तोडगा निघणार; आमदार अमोल खताळ
राजकारण

महसूलमंत्र्यांनी संगमनेरच्या जमिनीप्रश्नी अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे मागविले, तोडगा निघणार; आमदार अमोल खताळ

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच्या कॅबिनेट बैठकीनंतर, आमदार खताळ यांनी महसूलमंत्र्यांची भेट घेऊन या विषयावर त्वरित बैठक घेण्याची विनंती केली.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 6, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी, कसारा दुमाला, समनापूर आणि राजापूर येथील शेकडो कुटुंबांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या जमिनीच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघणार असल्याची माहिती संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी दिली.

आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार खताळ यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर, मंत्र्यांनी या प्रकरणी तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले असल्याचे म्हटले आहे.

या भागातील अनेक जमिनींवर आणि घरांवर ‘पोकळीस्त’ किंवा ‘इतर हक्कांतील कब्जेदार’ अशा अनधिकृत नोंदी करण्यात आल्या होत्या. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. बँक कर्ज, शिक्षण प्रमाणपत्र आणि इतर सरकारी सुविधांपासून ते वंचित राहत होते. तसेच, कौटुंबिक वाद आणि धमक्यांसारख्या समस्यांनाही त्यांना सामोरे जावे लागत होते.

या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी नागरिकांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे धाव घेतली. आमदार खताळ यांनी याप्रश्नी गांभीर्य लक्षात घेत, महसूलमंत्री बावनकुळे यांना सविस्तर निवेदन दिले. त्यांनी गुंजाळवाडी (गट क्र. ७९, ९२), कासारा दुमाला (गट क्र. ३२, ३६, ३७, ३८), समनापूर (गट क्र. ५६), आणि राजापूर (गट क्र. २८, ३८, ३०) या गावांमधील पोकळीस्त नोंदी रद्द करण्याची मागणी केली.

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच्या कॅबिनेट बैठकीनंतर, आमदार खताळ यांनी महसूलमंत्र्यांची भेट घेऊन या विषयावर त्वरित बैठक घेण्याची विनंती केली. महसूलमंत्री बावनकुळे यांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित अधिकाऱ्यांकडून सर्व कागदपत्रे मागवली आहेत आणि लवकरच बैठक घेऊन यावर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे खताळ यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 705
अमोल खताळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या नव्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकरांच्या जागी कोण? तटकरे यांनी केली या नावाची घोषणा

August 5, 2026

संगमनेरमध्ये कथित पाकिस्तानी ‘ग्लोरी’ क्रीम विक्रीप्रकरणी शिवसेना आक्रमक; तपासात दिरंगाई झाल्यास करणार ‘असे काही’!

August 4, 2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पत्रकारिता

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

By अनंत पांगारकरAugust 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अनंत पांगारकर | संगमनेर  सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संगमनेर नगर परिषदेच्या…

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

August 5, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या नव्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकरांच्या जागी कोण? तटकरे यांनी केली या नावाची घोषणा

August 5, 2026

बुधवार, ०५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.