Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रत्येक घरात महीला उद्योजिका निर्माण करून अर्थिक विकास करणार – डॉ. सुजय विखे
राजकारण

प्रत्येक घरात महीला उद्योजिका निर्माण करून अर्थिक विकास करणार – डॉ. सुजय विखे

कार्यक्रमाच्या अखेरीस, डॉ. विखेंनी १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान राहाता येथे परम पूज्य प्रदीप मिश्रा महाराज यांची शिव पुराण कथा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी:

फक्त घोषणा करून नाही तर कृती आणि योजनांची अंमलबजावणी करून राज्यातील महीलांच्या पाठीशी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात एक महीला उद्योजिका निर्माण करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विकासाची प्रक्रीया राबविणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

ढोले पाटील लॉन्स येथे तालुका कृषी विभाग, पंचायत समिती, उमेद व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लाभार्थी प्रमाणपत्र वितरण, पापड व फूड प्रोसेसिंग युनिट, महिला बचत गट कर्ज आणि खेळते भांडवलाचे अनुदान वाटप डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ होत्या. तसेच महायुतीचे पदाधिकारी, लाडक्या बहिणी उपस्थित होत्या. सुरुवातीस महिलांनी औक्षण करून डॉ. विखेंना राखी बांधली. 

डॉ. सुजय विखे म्हणाले, महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून, त्या क्षमतेला दिशा देणे आपले कर्तव्य आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिला व्यवसाय करून यश मिळवतील उद्या हजारो महिला त्यातून आर्थिक सक्षमता प्राप्त करू शकतात. समानतेची घोषणा अनेकदा ऐकू येते, पण घटनेने दिलेली समानता प्रत्यक्षात आणणे ही खरी जबाबदारी आहे. महिलांना वाटप होणारे साहित्य हे केवळ वस्तू नाही, तर त्यामागे त्यांचे भविष्य उज्वल आणि सुरक्षित करणारा दृष्टीकोन आहे.

संगमनेर शहरात सध्या गांजा, मटका यांसारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या महिला व कुटुंबांची चिंता व्यक्त करत, डॉ. विखे यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला अशा गोष्टींवर कठोर कारवाईचे आवाहन केले. ते म्हणाले, जेव्हा मुलगी घराबाहेर पडताना असुरक्षित वाटते, तेव्हा समाज म्हणून आपल्याला अंतर्मुख होवून विचार करावा लागतो. आजचे महायुती सरकार हे महिला भगिनींच्या पाठिंब्यामुळेच सत्तेवर आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विश्वव्यापी नेतृत्व आणि मार्गदर्शनाने राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून यशस्वीपणे जनतेसाठी काम करीत आहे. कोणताही विकास एकट्याने होत नाही. मतदारसंघात केलेल्या कामावर जनतेचा विश्वास आहे, आणि तो विश्वास तसाच राहील यासाठी सातत्याने प्रयत्न करत रहावे. 

कार्यक्रमाच्या अखेरीस, डॉ. विखेंनी १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान राहाता येथे परम पूज्य प्रदीप मिश्रा महाराज यांची शिव पुराण कथा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या कथेसाठी गावनिहाय महिला गटांची नावनोंदणी सुरू करण्यात येणार असून पासद्वारे सहभागी होता येणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 770
सुजय विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले…

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.