Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘न्यूज सह्याद्री एक्सप्रेस’च्या युट्यूब चॅनेल चालकाविरोधात संगमनेरात खंडणीचा गुन्हा दाखल
गुन्हेगारी

‘न्यूज सह्याद्री एक्सप्रेस’च्या युट्यूब चॅनेल चालकाविरोधात संगमनेरात खंडणीचा गुन्हा दाखल

भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३, कलम ३०८(२) आणि ३०८(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सालोमन सातपुते करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/08/2025Updated:07/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर तालुक्यातील एका सेवाभावी संस्थेची बदनामी करण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ‘न्यूज सह्याद्री एक्सप्रेस’ नावाच्या युट्यूब चॅनेलच्या चालकाविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून साळवे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील ‘दत्त धाम सरकार, दत्त दिगंबर सेवाभावी संस्थे’चे कामकाज पाहणारे शिवम राजेंद्र गडगे (वय २१) यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. आरोपीचे नाव साळवे (पूर्ण नाव माहित नाही रा. अकोले) असे असून, तो ‘न्यूज सह्याद्री एक्सप्रेस’ नावाचा युट्यूब चॅनेल चालवतो.

गडगे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, जुलै २०२४ पासून साळवे हा शिवम गडगे यांना संस्थेची बदनामी करणारे व्हिडिओ युट्यूबवर प्रसारित करण्याची धमकी देत होता. हे व्हिडिओ टाकू नयेत म्हणून तो त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होता. ४ ऑगस्ट २०२५ रोजी त्याने व्हॉट्सॲपवर गडगे यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली. वाटाघाटीनंतर ही रक्कम ६ लाख रुपयांवर ठरली, यापैकी ३ लाख तात्काळ आणि उर्वरित ३ लाख नंतर देण्याचे ठरले.

मंगळवारी (५ ऑगस्ट) सकाळी साळवेने पुन्हा फोन करून ४ लाख रुपये देण्याची मागणी केली. त्यासाठी त्याने गडगे यांना आधी धांदरफळ फाटा येथे आणि नंतर अकोले येथील बस स्टँडजवळील त्याच्या कार्यालयात बोलावले होते. 

अखेर, या सततच्या खंडणीच्या मागणीला कंटाळून गडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी संध्याकाळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५४४ भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३, कलम ३०८(२) आणि ३०८(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सालोमन सातपुते करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,301
क्राईम खंडणी गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्याचा विकास हा कष्टातून उभा राहिला असून केवळ मोबाईलवर अफवा…

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.