Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कथित मतचोरीचा पर्दाफाश: राहुल गांधींनी पुरावे दाखवत निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप
राजकारण

कथित मतचोरीचा पर्दाफाश: राहुल गांधींनी पुरावे दाखवत निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप

राहुल गांधींनी मतदारांच्या याद्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे पाच प्रकार सांगितले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

दिल्ली: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित मतचोरीचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रातील ४० लाखांहून अधिक मतदारांच्या याद्यांमध्ये संशयास्पद बाबी असल्याचं सांगत, त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आणि निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

महाराष्ट्रातील ४० लाख मतदारांचा घोटाळा?

राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत तब्बल ४० लाख मतदार वाढले, जे गेल्या पाच वर्षांतही वाढले नव्हते. निवडणुकीच्या काळात, विशेषतः संध्याकाळनंतर मतदानाच्या टक्क्यांमध्ये झालेली अचानक वाढही संशयास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं असतानाही, विधानसभा निवडणुकीत मात्र धक्कादायक निकाल लागले, यामागे हेच कारण असू शकतं.

मतदारांची बनावट यादी आणि ‘फॉर्म ६’ चा गैरवापर

राहुल गांधींनी सादर केलेल्या पुराव्यांनुसार, वाढलेल्या मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नावं, पत्ते आणि फोटो आहेत. त्यांनी ‘फॉर्म ६’ चा दुरुपयोग झाल्याचा आरोप केला.

कर्नाटक मधील एका मतदार संघाच्या एका उदाहरणाद्वारे त्यांनी स्पष्ट केलं की, शकुन राणी नावाच्या ७० वर्षीय महिलेने दोनदा अर्ज क्रमांक ६ भरला होता. दुसऱ्या अर्जात नाव ‘शकुनराणी’ असं होतं. हा अर्ज कोणी भरला किंवा त्या महिलेच्या नावाने कोणीतरी मतदान केलं असावं, असा संशय त्यांनी व्यक्त केला. ३३,६९२ नावांची यादी त्यांनी दाखवली, ज्यात बहुतांश मतदारांचं वय ९५, ९६, ९८ असं होतं. ही सर्व नावं बनावट असल्याचा त्यांचा दावा आहे. बंगळूर लोकसभा निवडणुकीतही अशाच प्रकारे मतदारांची चोरी झाल्याचं त्यांनी सांगितलं.

राहुल गांधींनी मतदारांच्या याद्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे पाच प्रकार सांगितले:

* दुबार मतदार: एकाच व्यक्तीचं नाव मतदार यादीत अनेक वेळा असणं.

* बनावट पत्ते आणि तपशील: चुकीच्या पत्त्यांचा वापर करून बनावट ओळख तयार करणे.

* एकाच पत्त्यावर अनेक लोक: एकाच पत्त्यावर ५० ते ६० लोक राहत असल्याचं दाखवणं, जिथे प्रत्यक्षात ४-५ लोकच राहतात.

* अस्पष्ट फोटो: ओळख पटणार नाही असे अस्पष्ट फोटो वापरणे.

* ‘फॉर्म ६’ चा गैरवापर: मतदारांच्या नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘फॉर्म ६’ चा चुकीच्या पद्धतीने उपयोग करणे.

राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत हे सर्व पुरावे दाखवून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 657
निवडणूक आयोग पत्रकार परिषद मत चोरी राहुल गांधी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले…

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.