Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये राजकारणाचा ‘कट’! माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या प्रयत्नातून मंजूर केलेले 40 कोटींचे रस्ते प्रकल्प रद्द; तालुक्यात संतापाची लाट, विविध गावांमधून नवीन लोकप्रतिनिधीचा निषेध
राजकारण

संगमनेरमध्ये राजकारणाचा ‘कट’! माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या प्रयत्नातून मंजूर केलेले 40 कोटींचे रस्ते प्रकल्प रद्द; तालुक्यात संतापाची लाट, विविध गावांमधून नवीन लोकप्रतिनिधीचा निषेध

बाळासाहेब थोरात यांनी 13 मार्च 2024 रोजी ग्रामविकास विभागाकडे संगमनेर तालुक्यातील विविध 8 रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश होऊन या रस्त्यांचे कॉन्टिटीकरण करावे याकरता मागणी केली होती. यानुसार शासन पत्र 4 ऑक्टोबर 2024 नुसार टप्पा दोन (बॅच १) च्या निर्णयानुसार 40 कोटी 73 लाख 81 हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/08/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका हा राज्यात अग्रेसर बनवला. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. या तालुक्यातील विविध 8 रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 40 कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर करून घेतला होता. मात्र नवीन लोकप्रतिनिधीने आठ महिन्यात एक रुपयाचा निधी न आणता राजकारणासाठी मंजूर रस्त्यांची कामे रद्द करून दुर्दैवी राजकारण केले असल्याची टीका संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर यांनी केली असून मर्जीतील ठेकेदारांना सांभाळण्यासाठी केलेल्या या उद्योगाने तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. 

तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 13 मार्च 2024 रोजी ग्रामविकास विभागाकडे संगमनेर तालुक्यातील विविध 8 रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश होऊन या रस्त्यांचे कॉन्टिटीकरण करावे याकरता मागणी केली होती. यानुसार शासन पत्र 4 ऑक्टोबर 2024 नुसार टप्पा दोन (बॅच १) च्या निर्णयानुसार 40 कोटी 73 लाख 81 हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. 

यामध्ये डिग्रस ते रणखांबवाडी 2.50 किलोमीटरसाठी 3 कोटी 53 लाख 97 हजार, चिखली ते जवळेकडलग 4.600 किलोमीटरसाठी 6 कोटी 31 लाख 89 हजार, खरशिंदे ते खांबे रस्ता दोन किलोमीटरसाठी 2 कोटी 45 लाख 96 हजार रुपये, मिर्जापुर ते धांदरफळ खुर्द रस्ता 4.26 किलोमीटरसाठी 5 कोटी 66 लाख 66 हजार रुपये, पारेगाव खुर्द ते तिगाव वडझरी रस्ता 5.030 किलोमीटरसाठी 6 कोटी 1 लाख 42 हजार रुपये, साकुर ते बिरेवाडी रस्ता 3.850 किलोमीटर लांबीसाठी 4 कोटी 81 लाख 57 हजार रुपये, शिंदोडी ते ठाकरवाडी रस्ता तीन किलोमीटर करता 4 कोटी 16 लाख 3 हजार रुपये, तासकरवाडी ते खंडेराया वाडी रस्ता 5.310 किलोमीटरसाठी 7 कोटी 76 लाख 31 हजार रुपये या कामांचा समावेश होता. एकूण 30.570 किलोमीटर लांबीसाठी 40 कोटी 73 लाख 81 हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र 7 ऑगस्ट 2025 च्या नव्या अध्यादेशानुसार ही सर्व कामे रद्द करण्याचा शासनाकडून दुर्दैवी निर्णय घेण्यात आला आहे.

मागील आठ महिन्यांमध्ये नवीन सरकारमधून एक रुपयाचा निधी न आणता जुन्याच निधीवर उद्घाटनाचे कार्यक्रम करणाऱ्या नवीन लोकप्रतिनिधीने आपल्या मर्जीतील ठेकेदारांना सांभाळण्यासाठी हे सर्व कामे रद्द करून आणली आहेत. जेणेकरून ही जुनीच कामे पुन्हा नव्याने टेंडर करता येतील आणि आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम देता येईल असा हा डाव आहे. याचबरोबर मागील आठ महिन्यांपासून संगमनेर शहर व तालुक्यामध्ये वातावरण खराब करण्याचे काम सुरू झाले आहे. 

यामुळे तालुक्यात नवीन लोकप्रतिनिधी विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून हा कुठला दडपशाहीचा प्रकार असा सवाल विचारला जात आहे. याचबरोबर असे दुर्दैवाचे राजकारण संगमनेर तालुक्यामध्ये कधीही नव्हते अशी भावना तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केलेल्या या रस्त्यांची कामे रद्द झाल्याने डीग्रस, रणखांबवाडी, साकुर पठार, चिखली, जवळेकडलग, खरशिंदे, खांबा, मिर्जापुर, धांदरफळ खुर्द, पारेगाव खुर्द, तिगाव, साकुर, बिरवाडी, शिंदोडी, ठाकरवाडी, तासकरवाडी खंडेरायवाडी या गावांमधील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून या सर्वांनी या दुर्दैवी घटनेचा निषेध केला आहे.

माजी मंत्री थोरात यांनी तालुक्यासाठी सातत्याने निधी आणलाहा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मागील 40 वर्षात दरवर्षी सरकारमधून सातत्याने निधी आणला. गावोगावी विकास कामे, साखळी बंधारे पूर्ण केली, निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले, सत्ता असो वा नसो माजी मंत्री थोरात यांच्या वैयक्तिक संबंधातून तालुक्याला कायम निधी मिळाला. मात्र प्रथमच निधी न आणता रद्द करण्याचा दुर्दैवी प्रकार तालुक्यात झाल्या असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे.

रस्त्याचा निधी रद्द करणे दुर्दैवी- माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी धांदरफळ खुर्द गावाकरिता आणि तालुक्यातील इतर 7 रस्त्यांसाठी निधी मंजूर करून घेतला होता. मात्र फक्त राजकारण करावे आणि आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम देता यावे याकरता नवीन लोकप्रतिनिधीने पालकमंत्र्यांच्या माध्यमातून रद्द केलेल्या कामाचा प्रकार निंदनीय असल्याची टीका संगमनेर पंचायत समितीच्या माजी सभापती तथा धांदरफळ खुर्दच्या रहिवासी निशाताई कोकणे यांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,293
निधी रद्द बाळासाहेब थोरात रस्ते प्रकल्प राजकारण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले…

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.