Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाकड जनावरे घेऊन शिव आर्मी आणि शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात, प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी; ठिय्या आंदोलन
आंदोलन

भाकड जनावरे घेऊन शिव आर्मी आणि शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात, प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी; ठिय्या आंदोलन

या आंदोलनादरम्यान काही वासरेही आणण्यात आली होती. आंदोलन संपल्यावर, नगरपालिका प्रशासनाने या वासरांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी पांजरपोळ येथे केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी : राज्यात भाकड जनावरे आणि वासरांचा प्रश्न गंभीर बनल्याने, शिव आर्मी शेतकरी संघटनेने आज (मंगळवारी,१३ ऑगस्ट) संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात शेतकरी आपली भाकड जनावरे घेऊन सहभागी झाले होते. आंदोलकांनी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आणि नंतर थेट प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली.

शेतकऱ्यांनी भाकड जनावरे आणि वासरांच्या सरकारी खरेदीची मागणी केली आहे. सध्या अशा जनावरांची खरेदी-विक्री पूर्णपणे थांबली आहे, त्यामुळे ती शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक बोजा बनली आहेत. या जनावरांचे योग्य संगोपन करण्यासाठी सरकारने गोशाळा किंवा शासकीय केंद्र स्थापन करावीत, अशीही मागणी आंदोलकांनी केली. तसेच, शासनाकडे जमा केलेल्या जनावरांच्या बदल्यात शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

शिव आर्मी शेतकरी संघटनेचे दत्ता ढगे आणि अनिकेत घुले यांच्यासह शेतकऱ्यांनी यावेळी आपले विचार मांडले. त्यांनी शासनाने या गंभीर प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी केली. यासोबतच, त्यांनी तथाकथित गोरक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आणि बजरंग दलावर गंभीर आरोप केले. मोकाट गुरांमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी सरकारने भरून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी अनिकेत घुले यांनी शासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला. जर सरकारने यावर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर सर्व भाकड जनावरे आणि गोर्हे आणून थेट मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सोडण्याचा इशारा त्यांनी दिला. दत्ता ढगे यांनीही, जोपर्यंत भाकड जनावरांना बाजारभावाप्रमाणे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.

या आंदोलनात अजीज ओहोरा, ठाकरे शिवसेनेचे अमर कतारी, सदाशिव हासे, उद्योजक शेतकरी कैलास पानसरे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. सुरुवातीला आंदोलनकर्त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. मात्र, अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने सर्व आंदोलक प्रांताधिकारी यांच्या दालनासमोर जमा झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गीते गायली. बराच वेळ वाट पाहूनही प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेतली नाही, त्यामुळे आंदोलकांनी संताप व्यक्त केला. अखेरीस, आंदोलनकर्त्यांच्यावतीने नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

  • या आंदोलनादरम्यान काही वासरेही आणण्यात आली होती. आंदोलन संपल्यावर, नगरपालिका प्रशासनाने या वासरांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी पांजरपोळ येथे केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,047
आंदोलन भाकड जनावरे शिव आर्मी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.