Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

August 4, 2026

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

August 4, 2026

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

August 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अज्ञानाचा बाजार मांडणाऱ्या वाचाळवीरांना शिवविचारांची चपराक; उद्या संगमनेरात ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे होणार सामूहिक वाचन!
आंदोलन

अज्ञानाचा बाजार मांडणाऱ्या वाचाळवीरांना शिवविचारांची चपराक; उद्या संगमनेरात ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे होणार सामूहिक वाचन!

समाजासमाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या अशा प्रवृत्तींचा मुखभंग करण्यासाठी महाविकास आघाडीसह सर्व पुरोगामी संघटना एकवटल्या आहेत.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: प्रतिनिधी

ज्यांनी अठरापगड जाती-धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे स्वराज्य उभे केले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास आज काही विकृत मानसिकतेच्या लोकांमुळे काळवंडण्याचा प्रयत्न होत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ज्या खालच्या पातळीवर जाऊन शिवविचारांचा अपमान केला आहे, त्याला आता वैचारिक मार्गाने उत्तर देण्याचा निर्धार संगमनेरकरांनी केला आहे.

याच पार्श्वभूमीवर, रविवारी (२६ एप्रिल) सकाळी आठ वाजता संगमनेरच्या नेहरू गार्डनमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करून शिवरायांचा खरा इतिहास जनमानसात मांडला जाणार आहे. या सामूहिक वाचनानंतर सकाळी १० वाजता संगमनेर बस स्थानक परिसरात गायकवाड यांच्या निषेधार्थ एल्गार पुकारला जाणार आहे.

सत्तेच्या गुर्मीत आणि अज्ञानाच्या अंधारात चाचपडणाऱ्या संजय गायकवाड यांनी ऐतिहासिक संदर्भांची मोडतोड करत या पुस्तकाबाबत अत्यंत गलिच्छ भाषा वापरली आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. समाजासमाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या अशा प्रवृत्तींचा मुखभंग करण्यासाठी महाविकास आघाडीसह सर्व पुरोगामी संघटना एकवटल्या आहेत.

शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम समाजातील शूरवीर होते, त्यांनी सर्वांना समान न्याय दिला, हाच खरा इतिहास पानसरे यांनी आपल्या पुस्तकातून मांडला आहे. हा इतिहास पुसण्याचे कारस्थान सुरू असल्यानेच ‘वाचनातून विचार आणि विचारातून परिवर्तन’ हे ब्रीद घेऊन संगमनेरमधील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, महिला आणि युवक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.

नेहरू गार्डन येथील वाचनानंतर शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून या वैचारिक क्रांतीची मशाल पेटवली जाणार आहे. या आंदोलनात संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिवरायांच्या बदनामीचा हा प्रयत्न हाणून पाडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 574
पुरोगामी संघटना महाविकास आघाडी शिव विचारांचा जागर संजय गायकवाड सामूहिक पुस्तक वाचन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

शेतकऱ्यांची गैरसोय न थांबल्यास संगमनेर तहसील कार्यालयासमोर ‘घंटानाद आंदोलन’, वंचित बहुजन आघाडीचा इशारा

August 4, 2026

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

July 31, 2026

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; सरकारच्या निषेधार्थ मशाल मोर्चात संगमनेरकर एकवटले, रस्त्यावर उतरले; बाळासाहेब थोरातांसह सर्व समविचारी पक्षीयांचा समावेश

July 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

धुळ्यात ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई रंगेहात जाळ्यात; तळेकर काही काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

By अनंत पांगारकरAugust 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  धुळे: पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांच्यावर धुळे…

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

August 4, 2026

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं

August 4, 2026

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

August 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.