Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रद्द झालेल्या रस्त्यांच्या कामांवरून संगमनेरचे राजकारण तापले; शिवसेनेचा थोरातांवर आरोप, तर रद्द झालेल्या कामांशी माझा संबंध नाही- आमदार खताळ
राजकारण

रद्द झालेल्या रस्त्यांच्या कामांवरून संगमनेरचे राजकारण तापले; शिवसेनेचा थोरातांवर आरोप, तर रद्द झालेल्या कामांशी माझा संबंध नाही- आमदार खताळ

संपूर्ण जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमध्येही असाच निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय राज्य सरकारचा आहे, त्यामुळे यात आमदार खताळ यांचा कोणताही वैयक्तिक संबंध नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी:

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून संगमनेर तालुक्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर या निर्णयावरून आमदार अमोल खताळ यांची जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा आरोप केला आहे.

आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा क्रमांक दोन संशोधन व विकास अंतर्गत ४ ऑक्टोंबर २०२४ रोजी मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने केवळ संगमनेर तालुक्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमध्येही असाच निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय राज्य सरकारचा आहे, त्यामुळे यात आमदार खताळ यांचा कोणताही वैयक्तिक संबंध नाही. असे असतानाही, बाळासाहेब थोरात आपल्या अपयशाचे खापर आमदार खताळ यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

थोरात यांना निधीची इतकीच काळजी असेल, तर त्यांनी रद्द झालेल्या कामांबाबत आपले भाचे आणि विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांना जाब का विचारला नाही? इतर वेळी केलेल्या नसलेल्या कामांचे श्रेय घेणारे थोरात, आता सरकारचा निर्णय आल्यावर आपल्याच भाच्यांना प्रश्न विचारण्यास टाळाटाळ करत आहेत. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी तांबे यांच्याशी चर्चा केल्यास त्यांचा गैरसमज दूर होईल, असेही म्हटले आहे.

आमदार खताळ यांनी अवघ्या आठ-नऊ महिन्यांच्या कार्यकाळात तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रस्त्यांची कामे आता पूर्ण होत असल्याने बाळासाहेब थोरात यांच्या अपयशाची चर्चा ग्रामीण भागात होत आहे. खताळ यांच्या कामाचे कौतुक सामान्य माणूस करत असल्यामुळेच थोरातांना हे सहन होत नाही. त्यामुळे ते वैयक्तिक बदनामी करत असल्याचा आरोप घोरपडे यांनी केला आहे.

यावर आमदार अमोल खताळ यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, रद्द झालेल्या कामांशी माझा कोणताही संबंध नाही. हा निर्णय का घेण्यात आला याची माहिती घ्यावी लागेल. या कामांसाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. प्रशासकीय स्तरावर काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करता येतील. मात्र यात कोणाचे वैयक्तिक हित दडले असेल तर तेही लवकरच समोर येईल. रद्द झालेली कामे पुन्हा मंजूर करण्यासाठी आपण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले आहे.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,113
अमोल खताळ आरोप प्रत्यारोप बाळासाहेब थोरात रस्ते प्रकल्प
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले…

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.