Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लेख लिहिला म्हणून पत्रकाराला देशद्रोहात अडकवाल का? सुप्रीम कोर्टाने सिंदूर वृत्तांकनावरून सरकारला झापलं
न्यायालय

लेख लिहिला म्हणून पत्रकाराला देशद्रोहात अडकवाल का? सुप्रीम कोर्टाने सिंदूर वृत्तांकनावरून सरकारला झापलं

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान आयएएफ जेटच्या कथित नुकसानाच्या संदर्भात वृत्तांकन केल्याप्रकरणी 'द वायर' च्या पत्रकारावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/08/2025Updated:14/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / नवी दिल्ली

वृत्तपत्रात लेख लिहिला वा वृत्तवाहिनीवर व्हिडीओ दाखवला म्हणून पत्रकारावर देशद्रोहाचा गुन्हा कसा काय होऊ शकतो? तो शस्त्र घेऊन लढत होता काय? नसेल तर कोणाच्याही विरोधात कशीही कारवाई करायला या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काही आहे की नाही असं विचारत सर्वोच्च न्यायालयाने सरकारची पुरती सालटी उतरवली.

सर्वोच्च न्यायालयाने ‘द वायर’च्या पत्रकारावरील देशद्रोही ठरवण्याच्या प्रकरणावरील सुनावणी दरम्यान ही टिप्पणी केली. कोणत्याही पत्रकारांचे लेख किंवा व्हिडीओ प्रथमदर्शनी देशाची एकता आणि अखंडता धोक्यात आणणारं कृत्य नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने ‘द वायर’चे सिद्धार्थ वरदराजन आणि ‘फाउंडेशन ऑफ इंडियापेंडेंट जर्नलिझम’च्या सदस्यांना अटकेपासून संरक्षण देताना ही टिप्पणी केली आहे.

लेख लिहिण्यासाठी किंवा बातम्यांचे व्हिडीओ तयार करण्यासाठी पत्रकारांना एखाद्या प्रकरणांमध्ये अडकवावं का? त्यासाठी अटक करावी का? असा सवाल करत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं की, ‘आम्ही पत्रकारांना एका वेगळ्या वर्गात वर्गीकृत करत नाही. मात्र, एखादा लेख देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका निर्माण करतो का? तो एक लेख आहे. असं नाही की कोणीतरी भारतात बेकायदेशीर शस्त्रे आणि दारूगोळा तस्करी करत आहे, असं खंडपीठाने स्पष्ट केलं.

‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान आयएएफ जेटच्या कथित नुकसानाच्या संदर्भात वृत्तांकन केल्याप्रकरणी ‘द वायर’ च्या पत्रकारावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. या आरोपाच्या सुनावणी वेळी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या.  जयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने हे महत्त्वपूर्ण भाष्य केलं. ऑपरेशन सिंदूर दरम्यान आयएएफ जेटच्या कथित नुकसानाबाबत केलेल्या वृत्तांकनाच्या संदर्भात संबंधित लेखकाने स्पष्टीकरण दिलं की, ‘त्यांनी हा अहवाल भारताच्या संरक्षण कर्मचाऱ्यांचा हवाला देत लिहिला होता, त्यामुळे त्यात देशद्रोह म्हणण्याचे कारण नाही, असं खंडपीठाने नमूद करत सरकारच्या कृतीची निर्भत्सना केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 421
द वायर सर्वोच्च न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

संगमनेर न्यायालयाचा मोठा निकाल! वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसवणाऱ्या चालकाला दिली ‘ही’ शिक्षा

07/10/2026

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संगमनेर येथील…

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.