Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नसरापूर हत्याकांड: ६५ वर्षीय नराधमाभोवती कायद्याचा फास आवळला; कोर्टात रोज …
न्यायालय

नसरापूर हत्याकांड: ६५ वर्षीय नराधमाभोवती कायद्याचा फास आवळला; कोर्टात रोज …

१ मे रोजी नसरापूर येथे ६५ वर्षीय भीमराव कांबळे याने घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीवर गोठ्यात अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली होती व मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/05/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:

पुण्यातील नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटल्याची सुनावणी गुरुवारी विशेष न्यायालयात पार पडली. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या १५ दिवसांत या प्रकरणाचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते.

या पार्श्वभूमीवर, घटनेच्या २८ दिवसांच्या आतच न्यायालयाने मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्यावर न्यायालयीन प्रक्रियेनुसार सर्व आरोप निश्चित केले आहेत. आरोपीविरोधात ‘प्राईमा फेसी’ (प्रथमदर्शनी) सबळ पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आता या खटल्याची सुनावणी दररोज ‘इन कॅमेरा’ पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या उपस्थितीत पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट, वैद्यकीय चाचण्या, लैंगिक चाचणी आणि सीसीटीव्ही फुटेज यांसारखे महत्त्वाचे पुरावे सादर केले. आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांसह पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१ मे रोजी नसरापूर येथे ६५ वर्षीय भीमराव कांबळे याने घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीवर गोठ्यात अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली होती व मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन आता दैनंदिन सुनावणीसाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 551
अल्पवयीन मुलीवर अत्याचार नसरापूर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.