Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मागील पिढीच्या योगदानाचा वारसा: थोरात कारखान्याची नवीन इमारत म्हणजे संघर्षाचे आणि एकजुटीचे प्रतीक- माजी मंत्री बाळासाहेब थोरात
शेती व सहकार

मागील पिढीच्या योगदानाचा वारसा: थोरात कारखान्याची नवीन इमारत म्हणजे संघर्षाचे आणि एकजुटीचे प्रतीक- माजी मंत्री बाळासाहेब थोरात

इमारतीचे उद्घाटन ज्यांनी तालुक्याच्या आणि सहकाराच्या उभारणीत मोठे योगदान दिले, त्या जुन्या पिढीतील सर्व माजी चेअरमन यांच्या हस्ते करण्यात आले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याला 'जुन्या पिढीचा सन्मान' असे संबोधले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी – स्वातंत्र्यसेनानी व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यासह मागील पिढीतील व्यक्तींनी तालुक्याच्या विकासाचा पाया रचला आहे. याच योगदानातून, संगमनेरच्या वैभवात भर टाकणारी थोरात कारखान्याची नवीन प्रशासकीय इमारत उभी राहिली असल्याचा गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या इमारतीचे उद्घाटन लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी चेअरमन बाळासाहेब पाटील गुंजाळ, बाजीराव पाटील खेमनर, माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे आणि बाबा ओहोळ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते.

कारखान्याने तालुक्याचे हृदय म्हणून काम केले- यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, कारखान्याने तालुक्याचे हृदय म्हणून काम करताना विकासात मोठे योगदान दिले आहे. अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानाचा वारसा आपण जपला आहे. काटकसर आणि पारदर्शकता जपताना उसाला उच्चांकी भाव दिला आहे.

ही नवीन इमारत म्हणजे सर्व माजी चेअरमन, पदाधिकारी, कामगार, शेतकरी आणि सभासद यांच्या योगदानाचे प्रतीक आहे. तालुक्यातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल केली आहे. अनेक अडथळे येत असले तरी कार्यकर्त्यांची एकजूट कायम आहे, हीच आपली ताकद आहे आणि हीच विकासाची वाटचाल यापुढेही कायम राहील.

सहकारात संगमनेरचे नेतृत्व देशासाठी दिशादर्शक- माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले, सहकारात कारखान्याची इतकी सुंदर आणि वैभवशाली इमारत कुठेही नसेल. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील संगमनेरचा सहकार देशासाठी दिशादर्शक आहे. सर्वसामान्यांचे जीवन घडवणाऱ्या या सहकाराचे राज्याचे नेतृत्व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी करावे.

यावेळी व्यासपीठावर कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, अजय फटांगरे, इंद्रजीत थोरात, राजेंद्र गुंजाळ, रामदास वाघ, कारखान्याचे संचालक संतोष हासे, संपतराव गोडगे, इंद्रजीत खेमनर, डॉ. तुषार दिघे, रामदास धुळगंड, रामनाथ कुटे, विनोद हासे, विजय राहणे, गुलाब देशमुख, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, लता गायकर, सुंदरबाई दुबे, दिलीप नागरे, अंकुश ताजने, माजी संचालक गणपतराव सांगळे, चंद्रकांत कडलग, आर्किटेक्ट बी. आर. चकोर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. कार्यक्रमाला सभासद शेतकरी, ऊस उत्पादक, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वांचा सन्मान- या इमारतीचे उद्घाटन ज्यांनी तालुक्याच्या आणि सहकाराच्या उभारणीत मोठे योगदान दिले, त्या जुन्या पिढीतील सर्व माजी चेअरमन यांच्या हस्ते करण्यात आले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याला ‘जुन्या पिढीचा सन्मान’ असे संबोधले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,212
उद्घाटन प्रशासकीय इमारत बाळासाहेब थोरात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शहरालगत सुमारे दीडशे किलो गांजा प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईत अटक करण्यात…

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.