Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेर पुन्हा एकवटले, आमदार तांबे-थोरातांनी ‘लाव रे व्हिडिओ’च्या माध्यमातून तथाकथित महाराजांचे सारेच सत्य समोर आणले; शांती मोर्चाला हजारो संगमनेरकरांची उपस्थिती
आंदोलन

बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेर पुन्हा एकवटले, आमदार तांबे-थोरातांनी ‘लाव रे व्हिडिओ’च्या माध्यमातून तथाकथित महाराजांचे सारेच सत्य समोर आणले; शांती मोर्चाला हजारो संगमनेरकरांची उपस्थिती

घुलेवाडी येथील घटना पूर्वनियोजित षडयंत्र असल्याचा आरोप करत थोरात यांनी विविध व्हिडिओ आणि पुरावे जनतेसमोर सादर केले. संग्राम भंडारे कसे खोटे बोलत आहेत आणि त्यांच्यावर कोणताही हल्ला झाला नाही, हे त्यांनी 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत सिद्ध केले. या षडयंत्रात भंडारे आणि नवीन लोकप्रतिनिधी यांचा हात असल्याचा दावा त्यांनी केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/08/2025Updated:21/08/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना नथुराम गोडसे होऊन जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तथाकथित संग्राम भंडारेचा निषेध करण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात-आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका आपली अस्मिता जपत एकवटला. हजारो नागरिकांनी एकत्र येऊन भव्य शांती मोर्चा काढला. या वेळी, संगमनेरच्या शांततापूर्ण विकासाला खीळ घालू पाहणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची हाक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.

तथाकथित संग्राम भंडारेचा निषेध करण्यासाठी  स्वाभिमानी संगमनेर तालुका, सकल हिंदू समाज, विविध पुरोगामी संघटना, महाविकास आघाडी, आध्यात्मिक व वारकरी संप्रदाय आणि इतर राजकीय पक्षांच्या वतीने हा भव्य सद्भावना शांती मोर्चा काढण्यात आला. व्यक्तिगत बाळासाहेब थोरात यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात संगमनेरकर एकवटले होते. यशोधन कार्यालयापासून नवीन नगर रोडपर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये २५ हजारहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.

या प्रसंगी बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले, मी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मुलगा आहे. संघर्ष आम्हाला नवीन नाही. कोणी नथुराम म्हणून समोर येणार असेल तर विचारांसाठी आणि तत्त्वासाठी बलिदान देण्याची आमची तयारी आहे. आम्ही हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. गगनगिरी महाराजांच्या सप्ताहमध्ये वाढण्यापासूनची कामे आम्ही केली आहेत. गावोगावी मंदिरांचे बांधकाम आणि सुशोभीकरण आम्ही केले. राष्ट्रपुरुष आणि संतांनी सांगितलेला मानवतेचा विचार घेऊनच आम्ही पुढे जात आहोत.

थोरात पुढे म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून त्यांनी तालुक्यात सुसंस्कृत राजकारणाची परंपरा निर्माण केली आहे. सातत्याने विकासकामे करून तालुक्याला राज्यात अग्रस्थानी आणले आहे. मात्र, काही लोकप्रतिनिधींना हा विकास सहन होत नाही, त्यामुळे ते तालुक्यात गुंडगिरी आणि दहशत निर्माण करत आहेत. मागील आठ महिन्यांत तालुक्यात अशांतता वाढली आहे, यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. लोकप्रतिनिधीच्या डीएनए तपासावा लागेल या वक्तव्याचा ही त्यांनी समाचार घेतला.

नवीन लोकप्रतिनिधीचा संगमनेरचा विकास मोडण्यासाठी हत्यार म्हणून वापर होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. भगवी टोपी घालून हिंदुत्वाचा आव आणणारे निवडणुकीआधी कधी टोपी घालत होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तथाकथित महाराज नारदाच्या गादीचा अपमान करतो आहे. पाकीट घेऊन कीर्तन करतो आहे. तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा डाव आखला जात असून गावोगावी गुंड दहशत माजवत आहे. आपल्याला आपल्या तालुक्याची संस्कृती जपायची असून तालुक्याच्या विकासाची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी गुंडांना वेळीच रोखा असे आवाहन त्यांनी केले. 

आमदार सत्यजित तांबे यांनीही या वेळी आपले विचार मांडले. ते म्हणाले, संगमनेरचा विकास हा बाळासाहेब थोरात यांच्या योगदानातूनच झाला आहे. सर्वांना सोबत घेऊन राजकारण करण्याची त्यांची परंपरा आहे. नवीन आमदारांनी आमचे हिंदुत्व पाहू नये. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणारा हा तथाकथित कीर्तनकार आम्हाला कधीही मान्य नाही. आम्ही वारकरी संप्रदायाचे हिंदुत्ववादी आहोत. त्यांनी कार्यकर्त्यांना घाबरून न जाण्याचा सल्ला देत आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

डॉ. जयश्री थोरात यांनी तरुणांवर दाखल होत असलेल्या खोट्या गुन्ह्यांबद्दल आवाज उठवला. त्या म्हणाल्या, दहशत निर्माण करण्याचे हे प्रयत्न आम्ही चालू देणार नाही. नथुराम गोडसे आपला आदर्श नाही. आपले हिंदुत्व हे दिखाऊ नसून खरे आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि आपण त्याच विचारांवर पुढे जात आहोत.

  • मोर्चाला अडवणूक आणि षडयंत्राचा पर्दाफाश – मोर्चाला येणाऱ्या गाड्या अडवल्याची माहिती मिळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पोलिस प्रशासनाला चांगलेच खडसावले. “तुम्ही कोणाचे घरगडी आहात का? हा अन्याय संगमनेर तालुका सहन करणार नाही,” असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.
  • घुलेवाडी येथील घटना पूर्वनियोजित षडयंत्र असल्याचा आरोप करत थोरात यांनी विविध व्हिडिओ आणि पुरावे जनतेसमोर सादर केले. संग्राम भंडारे कसे खोटे बोलत आहेत आणि त्यांच्यावर कोणताही हल्ला झाला नाही, हे त्यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत सिद्ध केले. या षडयंत्रात भंडारे आणि नवीन लोकप्रतिनिधी यांचा हात असल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व पुराव्यांनंतर जनतेने संग्राम भंडारेचा तीव्र निषेध केला.

मोर्चाची विविध छायाचित्रे….

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,995
बाळासाहेब थोरात शांती मोर्चा संग्राम भंडारे सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.