Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

August 2, 2026

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाळासाहेब थोरात यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत गोडसेच्या औलादीत नाही: हर्षवर्धन सपकाळ
राजकारण

बाळासाहेब थोरात यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत गोडसेच्या औलादीत नाही: हर्षवर्धन सपकाळ

धमकी देणारा व्यक्ती आम्ही नथुराम गोडसे होऊ असे म्हणतो, पण खरं तर ते आधीपासूनच गोडसेच्या विचारांचे आहेत. महत्त्वाचे म्हणजे, त्यांचा पक्षही त्याच विचारांनी प्रेरित आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 21, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

मुंबई, दि. २१ ऑगस्ट २०२५: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोधक भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या केसालाही धक्का लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीत नाही, असे ठामपणे सांगत, गरजणारे ढग बरसत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

तोंडी राम आणि बगलेत सुरी ही भाजपची कार्यपद्धती – या प्रकरणावर बोलताना सपकाळ म्हणाले की, “तोंडी राम आणि बगलेत सुरी” ही भाजपची जुनी कार्यपद्धती आहे. महात्मा गांधींची हत्या करण्यापूर्वी नथुराम गोडसे त्यांच्या पाया पडला आणि नंतर त्याने तीन गोळ्या झाडल्या, हा इतिहास आहे. आजही भाजप गोडसेच्या विचारांना मानणाऱ्या लोकांचे समर्थन करत आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. धमकी देणारा व्यक्ती आम्ही नथुराम गोडसे होऊ असे म्हणतो, पण खरं तर ते आधीपासूनच गोडसेच्या विचारांचे आहेत. महत्त्वाचे म्हणजे, त्यांचा पक्षही त्याच विचारांनी प्रेरित आहे. याउलट, बाळासाहेब थोरात हे महात्मा गांधींच्या तत्त्वांवर चालणाऱ्या काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, राज्यातील वातावरण बिघडवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच प्रोत्साहनाने धमक्या – भाजप अशा लोकांना का पोसते, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, अशी मागणी करत सपकाळ यांनी भाजपला सडेतोड इशारा दिला. भाजपने असे राजकारण थांबवावे, अन्यथा आज ते विरोधकांवर ज्यांना सोडत आहेत, तेच उद्या त्यांच्या अंगावर येतील. अशा धमक्या देणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच प्रोत्साहन मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असा आरोपही सपकाळ यांनी यावेळी केला.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 673
काँग्रेस धमकी बाळासाहेब थोरात हर्षवर्धन सपकाळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

By अनंत पांगारकरAugust 2, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: संगमनेर शहरात अवैध गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने तो जवळ बाळगणाऱ्या…

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.