Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझ्यावरील हल्ला संघाकडूनच, प्रधानाच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही: अभिजित दिपके यांचा गंभीर आरोप

June 16, 2026

संगमनेर येथे ‘सत्यशोधक विचारमंच’तर्फे हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

June 16, 2026

रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज

June 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तुमच्याविषयी कोणतीही सहानुभूती राहिलेली नाही, आमदार खताळ यांची माजी आमदारांवर टीका
राजकारण

तुमच्याविषयी कोणतीही सहानुभूती राहिलेली नाही, आमदार खताळ यांची माजी आमदारांवर टीका

पराभवाच्या भीतीपोटीच माजी आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते अशांतता निर्माण करत आहेत
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 21, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असून, माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आजच्या शांती मोर्चा नंतर आमदार अमोल खताळ यांनी माजी आमदारांवर हल्ला चढवला आहे. जनतेने पराभव करून तुमचा खुळखुळा केला आहे, आता तुमच्याविषयी कोणतीही सहानुभूती राहिलेली नाही, अशी टीका खताळ यांनी केली. तालुक्यातील विकासकामांची घडी बसत असल्यानेच तुम्हाला मोर्चे काढावे लागत आहेत, मात्र जनतेला तुमचे बेगडी हिंदुत्व ओळखता आले आहे, असेही ते म्हणाले.

गुरुवारी निघालेल्या शांती मोर्चानंतर आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रक देण्यात आले यात खताळ यांनी माजी आमदारांवर कटकारस्थानाचा आरोप करत, त्यांच्या स्विय सहायकानेच कीर्तनात गोंधळ घातला आणि आता सहानुभूती मिळवण्यासाठी भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले असल्याचा दावा केला. यापूर्वी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर हल्ले झाले तेव्हा तुमची सद्भावना कुठे गेली होती, असा सवाल केला.

माझा डीएनए वारकरी सांप्रदायातील असून, माजी आमदार माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी काळात राहुल गांधीच त्यांना घरात बसवतील आणि रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेतून त्यांना अधिक चांगली समज मिळेल, असं म्हटलं आहे.

तालुक्यात कोणताही गुंडगिरी सुरू नसून विकासकामांची घडी चांगल्या पद्धतीने बसत आहे. ज्यांची राजकीय घडी विस्कटलेली आहे, तेच अस्वस्थ झाले आहेत. मागील आठ महिन्यांत तालुक्याच्या विकासाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असून, विधानसभेतही मी सामान्य माणसांच्या प्रश्नांचा आवाज उठवत असल्यामुळेच माजी आमदारांना व्यक्तिगत पातळीवर टीका करण्यापलीकडे काहीही राहिले नाही.

माजी आमदारांची ४० वर्षांची अपयशी कारकीर्द उघड झाल्याचे शल्य त्यांना आहे. त्यामुळे ते तालुका अशांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप खताळ यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकणार असून, पराभवाच्या भीतीपोटीच माजी आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते अशांतता निर्माण करत आहेत, असेही ते म्हणाले. सत्यजीत तांबे यांच्या राजकीय वक्तव्यावर बोलताना खताळ यांनी, ते सत्तेच्या जवळ असल्याचे सांगत असले, तरी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात प्रचार का केला, असा प्रश्न उपस्थित केला.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,012
अमोल खताळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

माझ्यावरील हल्ला संघाकडूनच, प्रधानाच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही: अभिजित दिपके यांचा गंभीर आरोप

June 16, 2026

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा फुसका बार; वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचा थेट हल्लाबोल

June 15, 2026

सत्ताधारी अन् विरोधक आमनेसामने येणार! २२ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

June 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माझ्यावरील हल्ला संघाकडूनच, प्रधानाच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही: अभिजित दिपके यांचा गंभीर आरोप

By अनंत पांगारकरJune 16, 20260

​विशेष प्रतिनिधी / मुंबई “केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,”…

संगमनेर येथे ‘सत्यशोधक विचारमंच’तर्फे हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

June 16, 2026

रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज

June 16, 2026

आज मंगळवार, १६ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.