Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खरे ‘जायंट किलर’ तुम्ही मतदार, ४० वर्षांची मक्तेदारी संपवणाऱ्या संगमनेरच्या मतदारांचे शिंदे यांनी मानले आभार; विखे पिता पुत्रांसह मंत्री देसाईंची अनुपस्थिती!
राजकारण

खरे ‘जायंट किलर’ तुम्ही मतदार, ४० वर्षांची मक्तेदारी संपवणाऱ्या संगमनेरच्या मतदारांचे शिंदे यांनी मानले आभार; विखे पिता पुत्रांसह मंत्री देसाईंची अनुपस्थिती!

आमदार सत्यजित तांबे विरोधी की सत्ताधारी याबाबत भाष्य करण्याचे शिंदे यांनी टाळले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेरमध्ये ४० वर्षांची मक्तेदारी उलथवून टाकणाऱ्या मतदारांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर आभार मानले. अमोल खताळ हे ‘जायंट किलर’ असले तरी, खरे ‘जायंट किलर’ तुम्ही मतदार आहात, असे सांगत शिंदे यांनी मतदारांचे कौतुक केले. 

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून शिवसेनेचे खताळ निवडून आल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदे संगमनेरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी थोरात यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली.

शिंदे म्हणाले, हेलिकॉप्टरमधून यायला तीन तास लागले, पण संगमनेरमध्ये लोटलेला जनसागर पाहता भगवं वादळ इथे आल्याचं जाणवतं. अमोल खताळ हा सर्वसामान्य कार्यकर्ता असून त्याने संधीचं सोनं केलं आहे. त्याला निवडून देणारे तुम्ही मतदारच खरे ‘जायंट किलर’ आहात, कारण तुम्ही ४० वर्षांची मक्तेदारी उलथवून टाकली.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले, जे ‘खबऱ्या’, ‘खेळणं’ म्हणत होते, त्यांच्या हातात आता आपण खुळखुळा दिलाय खेळण्यासाठी. अमोल काम करत राहील, तुम्ही खेळत राहा. थोरात यांच्या स्थानिक संस्थांवरील वर्चस्वावरही त्यांनी टीका केली.

मतदारांनी एका सामान्य कार्यकर्त्याला निवडून देऊन विरोधकांना ४४० व्होल्टचा झटका दिल्याचं सांगितलं. २०१४ पूर्वी भ्रष्टाचाराची रांगच होती. अजूनही ते व्होट चोरी झाली म्हणतात, पण गेल्या ५०-६० वर्षात यांनी काय काय चोरलं, याचा विचार करा, असा टोलाही त्यांनी लगावला.

एकनाथ शिंदे यांनी खताळ यांचे कौतुक केले. संजय गांधी योजनेचे पद मिळाल्यावर अमोलने निराधारांना आधार दिला. त्यामुळे संधीचे सोनं करणारा आमदार कोण, तर अमोल खताळ, असे सांगत त्यांनी खताळ यांची प्रशंसा केली. खताळ यांनी मागणी केलेले सर्व प्रश्न शिवसेनेच्या मंत्र्यांशी संबंधित असल्याने ते तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील संगमनेरमधील सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात होते मात्र प्रत्यक्षात सभेवेळी हे दोघेही अनुपस्थित होते. ते परदेशात असल्याचा अहवाल देत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. याशिवाय मंत्री शंभूराजे देसाई हे देखील अनुपस्थित असल्याने याची देखील चर्चा रंगली होती. तर खताळ यांनी भाषणात टीका केलेले आमदार सत्यजित तांबे विरोधी की सत्ताधारी याबाबत भाष्य करण्याचे शिंदे यांनी टाळले.

वारकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगताना एका कीर्तनाच्या कार्यक्रमात वादग्रस्त विधान केल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धमकी देताना तथाकथित कीर्तनकाराने नथुराम गोडसे व्हावे लागेल असे सांगत मोठा वाद निर्माण केला होता. या अनुषंगाने देखील शिंदे यांनी कोणतेही भाष्य न केल्याने सभेनंतर याची चर्चा सुरु झाली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 853
एकनाथ शिंदे सभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले…

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.