Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये चार दिवसांच्या ‘फेस्टिवल’ला गुरुवारपासून सुरुवात, ‘वर्‍हाड निघालंय लंडनला’सह एकाहून एक सरस नाट्य-सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
सामाजिक

संगमनेरमध्ये चार दिवसांच्या ‘फेस्टिवल’ला गुरुवारपासून सुरुवात, ‘वर्‍हाड निघालंय लंडनला’सह एकाहून एक सरस नाट्य-सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

यंदा फेस्टिवलचे १७ वे वर्ष असून राजस्थान युवक मंडळाच्या स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष देखील आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी घेऊन येणारा ‘संगमनेर फेस्टिवल’ येत्या गुरुवारपासून (२८ ऑगस्ट) सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये विविध लोकप्रिय नाटकांसह संगीत आणि विनोदी कार्यक्रमांचा संगम साधण्यात आला आहे. राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 

यंदा फेस्टिवलचे १७ वे वर्ष असून राजस्थान युवक मंडळाच्या स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष देखील आहे. फेस्टिवल मध्ये सादर होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती अशी,

गुरुवार, २८ ऑगस्ट: सायंकाळी ६:३० वाजता सुप्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांचा गाजलेला एकपात्री प्रयोग ‘वर्‍हाड निघालंय लंडनला’ सादर होईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

शुक्रवार, २९ ऑगस्ट: सायंकाळी ७ वाजता संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा लोकप्रिय कार्यक्रम ‘आयुष्यावर बोलू काही’ होणार आहे.

शनिवार, ३० ऑगस्ट: सायंकाळी ७ वाजता लीना भागवत आणि मंगेश कदम अभिनीत विनोदी नाटक ‘आमने सामने’ सादर होईल, या नाटकाने अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

रविवार, ३१ ऑगस्ट: सायंकाळी ७ वाजता ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांच्यासह इतर कलाकारांचे पोट धरून हसायला लावणारे विनोदी नाटक सादर होईल.

हे सर्व कार्यक्रम मालपाणी लॉन्सच्या उत्सव सभागृहात आयोजित करण्यात आले आहेत. २९, ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी पुढील काही खुर्च्या देणगी प्रवेशिका घेऊन राखीव ठेवण्यात आल्या आहेत, तर मागील खुर्च्यांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे. सर्व संगमनेरकरांनी या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजस्थान युवक मंडळाने केले आहे. 

मंडळाचे कार्याध्यक्ष सुमित अट्टल, उपाध्यक्ष सागर मणियार, सचिव कल्पेश मर्दा, खजिनदार प्रतीक पोफळे, सहसचिव कृष्णा आसावा, सहखजिनदार वेणूगोपाल कलंत्री यांच्यासह कार्यकारणी सदस्य गिरीश मालपाणी, मनीष मणियार, नितीन लाहोटी, ओंकार बिहाणी, रोहित मणियार, सचिन पलोड , राजेश आर. मालपाणी, कल्याण कासट, सम्राट भंडारी, सुदर्शन नावंदर, व्यंकटेश लाहोटी, उमेश कासट, ओंकार इंदाणी, नंदन कासट, पवन करवा, चेतन नावंदर, अक्षय कलंत्री, अमित चांडक, निलेश एन. जाजू, आनंद लाहोटी, कौस्तुभ झंवर, शुभम असावा, महेश पडतानी, प्रथम खटोड, प्रणित मणियार आदी आयोजनासाठी प्रयत्न करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 808
मनीष मालपाणी संगमनेर फेस्टिवल सांस्कृतिक कार्यक्रम
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शहरालगत सुमारे दीडशे किलो गांजा प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईत अटक करण्यात…

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.