Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा; दोन्ही गटांतील बेचाळीस जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

02/11/2026

सोमवार ०२ नोव्हेंबर —- आजच्या दिवसाचे राशिभविष्य

02/11/2026

जेव्हा पालकमंत्र्यांच्या हातात क्रिकेटची बॅट येते तेव्हा….

01/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बनावट कागदपत्रे वापरून महिला बचत गटाला ३ लाखांचा गंडा- बँक व्यवस्थापकही हैराण, शहर पोलिसांत तक्रार; गुन्हा दाखल होण्याची शक्यता
गुन्हेगारी

बनावट कागदपत्रे वापरून महिला बचत गटाला ३ लाखांचा गंडा- बँक व्यवस्थापकही हैराण, शहर पोलिसांत तक्रार; गुन्हा दाखल होण्याची शक्यता

या प्रकरणातील संशयित आरोपी महिला हिच्यावर यापूर्वीही, २०२३ मध्ये एका शिक्षिकेची ५ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: बनावट कागदपत्रे वापरून एका महिलेने महिला बचत गटातील सदस्यांच्या नावाने ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली असून लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे महिला बचत गटांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या प्रकरणी, एका महिलेविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फसवणूक झालेली महिला, फरीन खान मोहम्मद शेख, यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. शेख यांनी केलेल्या तक्रारीनुसार संबंधित महिलेने तक्रारदार महिलेच्या नकळत आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड मिळवले. त्यानंतर, त्यांची खोटी सही करून ‘आयेशा महिला बचत गट’ आणि ‘जय हिंद महिला बचत गट’ या नावाने बँक ऑफ बडोदा, संगमनेर शाखेतून ३ लाख रुपयांचे कर्ज घेतले.

सिबिल स्कोअर तपासताना फसवणूक आली समोर- शेख फरीन यांना आपल्या भावासाठी मोबाईल घेण्यासाठी कर्ज घ्यायचे होते आणि त्यांनी आपला सिबिल (CIBIL) स्कोअर तपासला. त्यांचा सिबिल स्कोअर खूप कमी झाल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. याबाबत चौकशी करण्यासाठी त्या तातडीने बँक ऑफ बडोदामध्ये गेल्या. बँकेत त्यांना सांगण्यात आले की, एक वर्षापूर्वी घेतलेले ३ लाख रुपयांचे कर्ज थकले असल्यामुळे त्यांचा सिबिल स्कोअर खराब झाला आहे.

हे ऐकून फरीन यांना धक्का बसला आणि त्यांनी बँकेकडे सविस्तर माहिती मागितली. बँकेने दिलेल्या कागदपत्रांमध्ये त्यांच्या ओळखपत्रांवर खोट्या सह्या करून हे कर्ज काढल्याचे उघड झाले. फसवणूक करणाऱ्या महिलेने फरीनच्या मोबाईल नंबरशी लिंक नसलेल्या दुसऱ्याच खात्याचा वापर केला, ज्यामुळे त्यांना कर्जाबद्दल कोणताही ओटीपी किंवा मेसेज मिळाला नाही.

बँक कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय- बँकेचे व्यवस्थापक पंकज यांनीही तक्रारदाराची फसवणूक केल्याचे मान्य केले आणि त्यांना याबाबतचे पुरावे दिले. या कर्जाची रक्कम व्याजासह आता ४ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या संपूर्ण प्रकरणात संबंधित महिलेसोबत बँकेतील काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय फरीन यांनी व्यक्त केला आहे. 

त्यांनी फसवणुकीचे सर्व पुरावे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याकडे दिले आहेत. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी फसवणूक झालेल्या महिलेला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आणि असे आणखी प्रकार घडले आहेत का, याचीही तपासणी करण्याचे आश्वासन दिले आहे.

संबंधित संशयित महिलेवर यापूर्वीही गुन्हा- या प्रकरणातील आरोपी महिला हिच्यावर यापूर्वीही, २०२३ मध्ये एका शिक्षिकेची ५ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. या घटनेमुळे महिला बचत गट आणि इतर महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,534
गुन्हेगारी फसवणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा; दोन्ही गटांतील बेचाळीस जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

02/11/2026

दोडक्याच्या पिकात गांजाची शेती; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची धडक कारवाई

01/11/2026

शेतकऱ्याकडे लाच मागणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञावर गुन्हा दाखल

30/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा; दोन्ही गटांतील बेचाळीस जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar02/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात पूर्वकल्पना व प्रशासकीय सूचना झुगारून लोखंडी पोल…

सोमवार ०२ नोव्हेंबर —- आजच्या दिवसाचे राशिभविष्य

02/11/2026

जेव्हा पालकमंत्र्यांच्या हातात क्रिकेटची बॅट येते तेव्हा….

01/11/2026

संगमनेर तालुका कोणाची जहागीरदारी नाही; जनतेने परिवर्तन घडविले: आमदार अमोल खताळ

01/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.