Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण मोर्चा बंदोबस्तासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल इतके पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात
आंदोलन

जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण मोर्चा बंदोबस्तासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल इतके पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात

शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, नगर ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांची प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/08/2025Updated:27/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

अहिल्यानगर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा एक मोठा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघत आहे. बुधवारी, (२७ ऑगस्ट) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथून सुरू होणारा हा मोर्चा अहिल्यानगर जिल्ह्यातून पुढे जाणार असल्याने, जिल्हा प्रशासनाने येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शेवगावपासून पारनेरपर्यंतच्या रस्त्यांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

या मोर्चादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर असणार आहेत. हा मोर्चा अहमदनगर जिल्ह्यात कर्‍हेटाकळी (ता. शेवगाव) येथे प्रवेश करेल आणि त्यानंतर घोटण, तळणी, शेवगाव शहर, ढोरजळगाव, मिरी, माका, जेऊर, दुधडेअरी चौक, नवनागापूर, नेप्ती, भाळवणी आणि टाकळी ढोकेश्वरमार्गे पारनेर तालुक्यातील काळेवाडीहून पुणे जिल्ह्याच्या आळेफाट्याकडे रवाना होईल. हा मोर्चा २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचण्याची शक्यता आहे.

अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे हे या बंदोबस्ताचे प्रमुख असतील. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण मार्गाला तीन सेक्टरमध्ये विभागण्यात आले आहे. यामध्ये शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, नगर ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांची प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

या बंदोबस्तासाठी एकूण ८५० पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले जातील. यात एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, तीन पोलीस उपअधीक्षक, १४ पोलीस निरीक्षक, ७९ सहायक व उपनिरीक्षक, ६३९ पुरुष अंमलदार आणि ८० महिला अंमलदार यांचा समावेश आहे. तसेच, एक दंगल नियंत्रण पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) देखील सुरक्षेसाठी तयार ठेवले आहे.

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्याच्या नागरिकांना देखील शांतता व संयम राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 897
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण मोर्चा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शहरालगत सुमारे दीडशे किलो गांजा प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईत अटक करण्यात…

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.