Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात कारखान्यात गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
धार्मिक

थोरात कारखान्यात गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

अमृतेश्वर मंदिरासमोरील प्रांगणात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत ५६ व्या वर्षीच्या गणेशोत्सवाचे कार्यक्रम होणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अमृत सांस्कृतिक मंडळाच्यावतीने यंदा गणेशोत्सव काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी महसूल आणि शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये चित्रपट अभिनेते, अभिनेत्री आणि प्रसिद्ध कलावंत सहभागी होणार आहेत.

अमृतेश्वर मंदिरासमोरील प्रांगणात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत ५६ व्या वर्षीच्या गणेशोत्सवाचे कार्यक्रम होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आणि कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी दिली.

यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे.

अमृत सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष जगन्नाथ घुगरकर, कार्याध्यक्ष रामदास तांबडे, सेक्रेटरी संदीप दिघे, भारत देशमुख, तसेच संचालक अनिल हासे, अनिल वरपे, बबन सावंत, संजय मांडे, अनिल पाटोळे, अनिल मोकळ, दिलीप तांबे, विनायक जोंधळे आणि सचिव राजू बडे यांनी घुलेवाडी, मालदाड, संगमनेर, गुंजाळवाडी, वेल्हाळे, अमृत नगर आणि तालुक्यातील सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

प्रमुख कार्यक्रमांची माहिती:

बुधवार, २७ ऑगस्ट: गणेशमूर्तीची मिरवणूक आणि स्थापना.

गुरुवार, २८ ऑगस्ट: दुपारी ३ ते ५ या वेळेत रांगोळी आणि मेहंदी स्पर्धा.

शुक्रवार, २९ ऑगस्ट: रात्री ८ वाजता ‘हीच खरी फॅमिलीची गंमत आहे’ हे विनोदी नाटक सादर होईल. यामध्ये सागर कारंडे, शलाका पवार, हर्षदा कर्वे, प्रतीक पाध्ये, राकेश शालिनी आणि संतोष पवार यांसारखे हास्य अभिनेते उपस्थित राहणार आहेत.

शनिवार, ३० ऑगस्ट: विद्यार्थ्यांसाठी शालेय क्रीडा स्पर्धा.

रविवार, ३१ ऑगस्ट: रात्री ८ वाजता ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा महाराष्ट्राची लोकसंस्कृती दर्शवणारा कार्यक्रम सादर केला जाईल.

सोमवार, १ सप्टेंबर: रात्री ८ वाजता अमृतेश्वर भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम.

मंगळवार, २ सप्टेंबर: रात्री ८ वाजता गाजलेले नाटक ‘सुंदर मी होणार’ सादर होईल, ज्यात विद्याधर जोशी, स्वानंदी टिकेकर, अभिजीत चव्हाण, अमोल बावडेकर, सृजन देशपांडे, विराज ओढेकर आणि श्रुती पाटील हे कलाकार असतील.

बुधवार, ३ सप्टेंबर: संगीत खुर्ची आणि चमचा लिंबू स्पर्धा.

गुरुवार, ४ सप्टेंबर: रात्री ८ वाजता ‘एकापेक्षा एक अप्सरा’ हा लावणीचा कार्यक्रम.

शुक्रवार, ५ सप्टेंबर: रात्री ८ वाजता शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित ‘नवरदेव’ हा चित्रपट दाखवला जाईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 803
थोरात कारखाना सांस्कृतिक कार्यक्रम
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.