Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यात चांगला पाऊस पडू दे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण यशस्वी होऊ दे: बाळासाहेब थोरात यांची गणेश चरणी प्रार्थना
धार्मिक

राज्यात चांगला पाऊस पडू दे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण यशस्वी होऊ दे: बाळासाहेब थोरात यांची गणेश चरणी प्रार्थना

यावेळी सुदर्शन निवासस्थान, अमृत उद्योग समूह, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी बँक, यशोधन कार्यालय अशा विविध ठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात आली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी गणेशोत्सवानिमित्त राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक सुखी, समाधानी व्हावेत, अशी प्रार्थना केली आहे. तसेच, मराठा आरक्षणाचे आंदोलन यशस्वी होऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

थोरात यांनी आपल्या ‘सुदर्शन निवासस्थानी’ सपत्नीक गणेशाची स्थापना केली, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत कन्या डॉ. जयश्री थोरात आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. हसमुख जैन उपस्थित होते.

यावर्षी काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी काही ठिकाणी पाऊस कमी आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडून शेतकरी सुखी आणि समाधानी व्हावा, अशी प्रार्थना थोरात यांनी केली.

मराठा आरक्षणाला पाठिंबा- मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाचे थोरात यांनी समर्थन केले. हे आंदोलन एक लोकचळवळ असून सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांचा आदर करून त्यांना तातडीने आरक्षण द्यावे असे ते म्हणाले. ओबीसी, आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आमची मुख्य मागणी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे असे आवाहन थोरात यांनी केले. महाविकास आघाडीच्या काळातही मराठा आरक्षणासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता, अशी आठवण त्यांनी करून दिली.

यावेळी डॉ. जयश्री थोरात यांनीही गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. संगमनेर शहर आणि तालुक्यातील सर्व नागरिकांच्या जीवनातील विघ्ने गणेशाने दूर करावीत, अशी प्रार्थना त्यांनी केली.

यावेळी सुदर्शन निवासस्थान, अमृत उद्योग समूह, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी बँक, यशोधन कार्यालय अशा विविध ठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,315
गणेशोत्सव प्रतिष्ठापना बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शहरालगत सुमारे दीडशे किलो गांजा प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईत अटक करण्यात…

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.