Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या मेनरोडवर डीजे वाजवण्यास ‘यांनी’ घेतला आक्षेप, हे आहे कारण….
सामाजिक

संगमनेरच्या मेनरोडवर डीजे वाजवण्यास ‘यांनी’ घेतला आक्षेप, हे आहे कारण….

या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात धाव घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही व्यापारी आणि नागरिकांनी दिला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर,प्रतिनिधी: संगमनेर शहरातील मेनरोडवर कोणत्याही सण, उत्सव किंवा मिरवणुकीमध्ये कर्कश आवाजातील डीजे वाजवण्यास बंदी घालावी, अशी मागणी करत शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी प्रांताधिकारी कार्यालयात जात प्रांताधिकारी अरुण उंडे यांना एक सामूहिक निवेदन दिले आहे.

या निवेदनामध्ये, संगमनेर शहरातील मेनरोडवर डीजेच्या मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाचे गांभीर्य मांडण्यात आले आहे. डीजेच्या दणदणाटामुळे दुकानांमधील विक्री व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, आवाजाच्या कंपनामुळे अनेक घरांमध्ये वस्तू खाली पडून नुकसान होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत.

याशिवाय, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना डीजेच्या मोठ्या आवाजामुळे आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने मेनरोडवर कोणत्याही कार्यक्रमात डीजे वाजवण्यासाठी परवानगी दिली जाऊ नये असे, निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या संदर्भात, याआधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी कोणत्याही ठिकाणी डीजे वाजल्यास तात्काळ कारवाई करून तो जप्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र, स्थानिक प्रशासनाने या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे.

या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात धाव घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही व्यापारी आणि नागरिकांनी दिला आहे.

या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, स्थानिक आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे, अप्पर जिल्हा पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे आणि डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांना पाठवण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,318
कारवाई डीजे डीजे बंदी व्यापारी संघटना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शेतकी सहकारी संघ ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची…

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.