Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ढोल-ताशांच्या गजरात दुमदुमले संगमनेर, ‘आय लव संगमनेर’च्या महावादन सोहळ्याला प्रचंड प्रतिसाद
धार्मिक

ढोल-ताशांच्या गजरात दुमदुमले संगमनेर, ‘आय लव संगमनेर’च्या महावादन सोहळ्याला प्रचंड प्रतिसाद

यावेळी डॉ. सुधीर तांबे, गिरीश मालपाणी आणि डॉ. जयश्री थोरात यांनीही सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आदर्श संगमनेर तालुक्याचा लौकिक देशात वाढवा – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

‘आय लव संगमनेर’ ही चळवळ संगमनेरची संपन्नता वाढवणारी – आमदार सत्यजित तांबे

महावादन सोहळ्यातून स्थानिक कलाकारांचा गौरव

संगमनेर – 

शुक्रवारी गणेशोत्सवाच्या उत्साहात संगमनेर शहर ढोल-ताशांच्या गजराने दुमदुमून गेले. ‘आय लव संगमनेर’ या चळवळीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महावादन सोहळ्यामध्ये तब्बल ४०० हून अधिक कलाकारांनी एकत्र येत अप्रतिम सादरीकरण केले. या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, गिरीश मालपाणी, दिलीप पुंड, डॉ. मैथिली तांबे, नितीन अभंग यांच्यासह ‘आय लव संगमनेर’ चळवळीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आदर्श संगमनेर तालुक्याचा लौकिक देशभरात वाढवा – बाळासाहेब थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्याला शिक्षण, सहकार आणि कृषी क्षेत्राच्या विकासाची मोठी परंपरा आहे. इथला राजकीय सुसंस्कृतपणा आणि सर्वधर्म समभावाचे वातावरण आदर्शवत आहे. हे आदर्श कायम ठेवत, तरुणांनी ‘आय लव संगमनेर’सारख्या चळवळींच्या माध्यमातून तालुक्याचा लौकिक वाढवावा. ‘आय लव संगमनेर’ ही चळवळ शहराची संपन्नता वाढवण्यासाठी एक मोठे व्यासपीठ ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महावादन सोहळा संगमनेरच्या एकतेचे प्रतीक – या सोहळ्याचे आयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले की, संगमनेरमधील अनेक ढोल-ताशा पथके देशभरात आपली कला सादर करतात. या गुणी कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ही संगमनेरची खरी ओळख आहे. हा महावादन सोहळा केवळ कलाकारांना प्रोत्साहन देत नाही, तर संगमनेरच्या एकतेचे आणि समृद्ध संस्कृतीचे प्रतीक आहे.

हजारो लोकांची विक्रमी उपस्थिती – संगमनेर बस स्थानकावर आयोजित केलेल्या या सोहळ्यामध्ये तांडव, रुद्र, एकलव्य, छावा, हिंदू राजा अशा अनेक नामांकित ढोल-ताशा पथकांनी सहभाग घेतला. मराठी आणि हिंदी गाण्यांच्या तालावर ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण वातावरण भारून गेले होते. आकर्षक विद्युत रोषणाई आणि भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्याला हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली.

यावेळी डॉ. सुधीर तांबे, गिरीश मालपाणी आणि डॉ. जयश्री थोरात यांनीही सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,018
आय लव संगमनेर बाळासाहेब थोरात महावादन सोहळा सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शहरालगत सुमारे दीडशे किलो गांजा प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईत अटक करण्यात…

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.