Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हैदराबादच्या टीमकडून संगमनेरच्या कचरा व्यवस्थापन मॉडेलची पाहणी
विकास

हैदराबादच्या टीमकडून संगमनेरच्या कचरा व्यवस्थापन मॉडेलची पाहणी

तत्कालीन मुख्याधिकारी सचिन बांगर व राहुल वाघ, तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पासाठी मोठे काम करण्यात आले होते. तर सध्याचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी या प्रकल्पाला आणखी चालना दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर- 

संगमनेर नगर परिषदेने राबवलेला घनकचरा व्यवस्थापनाचा यशस्वी प्रकल्प आता देशातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरत आहे. याच यशस्वी मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी आंध्र प्रदेशातील एका विशेष टीमने नुकतीच संगमनेर येथील कचरा डेपोला भेट दिली. या टीमने कचरा वर्गीकरण, खत निर्मिती आणि वीज निर्मिती प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली.

तत्कालीन मुख्याधिकारी सचिन बांगर व राहुल वाघ, तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पासाठी मोठे काम करण्यात आले होते. तर सध्याचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी या प्रकल्पाला आणखी चालना दिली. संगमनेर नगर परिषद शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्याचे ओला, सुका आणि घातक कचऱ्यामध्ये वर्गीकरण करते. या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत आणि वीज तयार केली जाते. या प्रकल्पातून पालिकेला दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. 

आंध्र प्रदेशातील पर्वतीपुरम मन्यम जिल्ह्यातील १२ जणांच्या टीमने या प्रकल्पाची पाहणी केली. या भेटीदरम्यान, मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी टीमला कचरा संकलनापासून ते त्याच्या प्रक्रियेपर्यंतची संपूर्ण माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पालिकेद्वारे तयार होणाऱ्या सेंद्रिय खताला महाराष्ट्र शासनाचा हरित ब्रँडचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या खताला मोठी मागणी असून शेतकरी त्याचा वापर करत आहेत. याशिवाय, कचऱ्यातून तयार होणाऱ्या विजेचा वापर कंपोस्ट डेपोवरील काही यंत्रसामग्री चालवण्यासाठी केला जातो, यामुळे हा प्रकल्प अधिक कार्यक्षम आणि आत्मनिर्भर बनला आहे.

आंध्र प्रदेशात घनकचरा व्यवस्थापन करताना येणाऱ्या अडचणींवर संगमनेरमध्ये कशा प्रकारे उपाययोजना केल्या जातात, याबद्दलही टीमने माहिती घेतली. या टीममध्ये पद्मजा अम्मा आणि दिलीप घोष यांच्यासह इतर सदस्य होते. त्यांनी स्वच्छता विभागाच्या कामाचे कौतुक केले.

या यशस्वी मॉडेलचा अभ्यास केल्यानंतर, हैदराबादमध्येही याच धर्तीवर कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प सुरू केला जाईल, असे टीमने सांगितले. पालिकेने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. या भेटीदरम्यान, कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ, स्वच्छता निरीक्षक अमजद पठाण, राहुल मंडलिक, शहर समन्वयक शुभम निचित आणि डेपो सुपरवायझर सुधीर दराडे उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 581
आंध्रप्रदेश टीम कचरा प्रकल्प पाहणी दौरा रामदास कोकरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या; आमदार अमोल खताळ यांचे प्रशासनाला निर्देश

22/06/2026

संगमनेर तालुक्याला १०.५० कोटींचा निधी; दोन मोठ्या पुलांचे काम मार्गी – आमदार अमोल खताळ

18/12/2025
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.