Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

26/08/2026

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

26/08/2026

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला मिळाले हे आंतरराष्ट्रीय मानांकन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन

26/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धार्मिक मिरवणुकीत स्वच्छतेचा नवा आदर्श: संगमनेरात तरुणांचा ‘झाडू’ सोबत प्रेरणादायी संदेश हजरत पैगंबर जयंतीनिमित्त एकता नगर सोशल ग्रुपचा उपक्रम; नागरिकांनी केले कौतुक
सामाजिक

धार्मिक मिरवणुकीत स्वच्छतेचा नवा आदर्श: संगमनेरात तरुणांचा ‘झाडू’ सोबत प्रेरणादायी संदेश हजरत पैगंबर जयंतीनिमित्त एकता नगर सोशल ग्रुपचा उपक्रम; नागरिकांनी केले कौतुक

मिरवणुकीनंतर अनेक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता राहते, मात्र संगमनेरमधील या तरुणांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे, यामुळे मिरवणुकीतील हा उपक्रम शहरासाठी नक्कीच अनुकरणीय ठरला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – मोहसीन शेख

धार्मिक उत्सव म्हटला की उत्साहाचे वातावरण असते, मात्र या उत्साहात सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारी उदाहरणे क्वचितच पाहायला मिळतात. संगमनेर शहरात हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत (जुलूस) असेच एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. येथील एकता नगर सोशल ग्रुपच्या तरुणांनी हातात पारंपरिक झेंडे किंवा बॅनर न घेता, ‘झाडू’ घेऊन मिरवणुकीच्या मागे स्वच्छतेची मोहीम राबवली. त्यांच्या या कृतीमुळे धार्मिक उत्सवाला एक नवी सामाजिक दिशा मिळाली आहे.

सोमवारी, (८ सप्टेंबर) नाईकवाडपुरा येथील जुम्मा मस्जिद येथून सुरू झालेली मिरवणूक शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून पुढे जात होती. तरुणाईचा जोश आणि उत्साह यात भरलेला होता. मात्र, मिरवणूक पुढे सरकत असताना, एकता नगर सोशल ग्रुपचे सदस्य हातात झाडू घेऊन मिरवणुकीच्या मार्गावरची घाण आणि कचरा साफ करत होते. स्वच्छ संगमनेर – सुंदर संगमनेर असा नारा देत त्यांनी केवळ संदेशच दिला नाही, तर तो प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला.

जुम्मा मस्जिदपासून सुरू झालेला हा जुलूस नाईकवाडपुरा, लखमीपुरा, देवी गल्ली, मोगलपुरा, सय्यद बाबा चौक, नाशिक रोड, मोमीनपुरा, नगरपालिका, रंगारगल्ली, गांधी चौक, तेली खुंट मार्गे पुन्हा मोगलपुरा येथे शांततेत पार पडला. मिरवणूक पार पडल्यानंतर मागे कोणताही कचरा किंवा घाण राहणार नाही याची काळजी या तरुणांनी घेतली.

या स्तुत्य उपक्रमात शेख जावेद गुलाम मोहम्मद, जावेद सादिक शेख, मोहसीन शेख, अफरोज पठाण, शाविद शेख, तौसिफ शेख, मुजू शेख, सहेबाज शेख, सरफराज पठाण, सलीम पठाण, आतिफ शेख, वसीम शेख, मुजाहिद पठाण, फिरोज पठाण, इमरान पठाण, नदीम सौदागर, सलमान शेख, बाबू शेख, साद शेख, नदीम तांबोळी, शकील शेख, अदनान सय्यद, शादाब शेख, मोबीन शेख, नियाज शेख, सोहेल शेख, इस्माईल शेख, फजील शेख, जीशान शेख, मुन्ना शेख, सलमान शेख, शाकीर शेख, समीर शेख, मोईश शेख, रमीज शेख, अझहर शेख, काशीब शेख, शाहिद शेख, साहिल शेख, फरीद सय्यद, हासिम शेख आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

धार्मिक परंपरेला सामाजिक स्वच्छतेची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वसामान्य नागरिकांनी मनापासून कौतुक केले. मिरवणुकीनंतर अनेक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता राहते, मात्र संगमनेरमधील या तरुणांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे, यामुळे मिरवणुकीतील हा उपक्रम शहरासाठी नक्कीच अनुकरणीय ठरला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,566
ईद मिरवणूक स्वच्छता अभियान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

By Annant Ppangarkar26/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: कर्म करणे ही जीवनाची अपरिहार्यता आहे; मात्र त्या…

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

26/08/2026

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला मिळाले हे आंतरराष्ट्रीय मानांकन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन

26/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.