अहिल्यानगर –
जिल्ह्यात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याबरोबरच, धोका असलेल्या भागांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, विखे पाटील यांनी प्रशासनाला पूर्णपणे सतर्क राहण्यास सांगितले आहे. प्रशासनाने पाच आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्यातील १९ महसूल मंडळांतील गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये पारनेर (३), पाथर्डी (३), श्रीगोंदा (८) आणि कर्जत (५) या तालुक्यांतील मंडळांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर नुकसानीचा नेमका आकडा समोर येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. मात्र, सद्यस्थितीत नागरिकांना तातडीची मदत पोहोचवण्यावर भर दिला जात आहे.
पाथर्डी तालुक्यातील करंजी आणि कासार पिंपळगाव येथील पाण्यात अडकलेल्या करंजी येथील १५ आणि कासार पिंपळगाव येथील १६ अशा एकूण ३१ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. याचप्रकारे, कर्जत तालुक्यातील करपडी येथे तलावाच्या पाण्याने वेढलेल्या एका कुटुंबातील ५ व्यक्तींना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश आले आहे.
पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाला सर्वतोपरी उपाययोजना करण्याच्या सूचनाही विखे पाटील यांनी दिल्या आहेत. मंगळवारी ते स्वतः बाधित भागांची पाहणी करणार आहेत.
अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत, प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना: पालकमंत्री विखे पाटील
प्रशासनाला सर्वतोपरी उपाययोजना करण्याच्या सूचनाही विखे पाटील यांनी दिल्या आहेत. मंगळवारी ते स्वतः बाधित भागांची पाहणी करणार आहेत.



अहिल्यानगर – 
पाथर्डी तालुक्यातील करंजी आणि कासार पिंपळगाव येथील पाण्यात अडकलेल्या करंजी येथील १५ आणि कासार पिंपळगाव येथील १६ अशा एकूण ३१ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. याचप्रकारे, कर्जत तालुक्यातील करपडी येथे तलावाच्या पाण्याने वेढलेल्या एका कुटुंबातील ५ व्यक्तींना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश आले आहे.

