Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी नगरसेवक डॉ. दानिश खान यांच्या गांधीगिरी आंदोलनामुळे संगमनेरमधील रखडलेल्या विकासकामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर!
आंदोलन

माजी नगरसेवक डॉ. दानिश खान यांच्या गांधीगिरी आंदोलनामुळे संगमनेरमधील रखडलेल्या विकासकामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर!

कौन्सिल अस्तित्वात असताना तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांची विकासकामे प्रस्तावित करण्यात आली होती. यामध्ये विविध प्रभागांतील रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांची कामे समाविष्ट होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर – मोहसीन शेख
गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या संगमनेर नगर परिषदेमध्ये विकासकामे ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. माजी नगरसेवक डॉ. दानिश खान यांनी शहरातील त्यांच्या प्रभागात असलेल्या लखमीपुरा भागात रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात अनोखे ‘गांधीगिरी’ आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये गुलाबाची रोपे लावून त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रकाश टाकला आणि नागरिकांचे मूलभूत प्रश्न किती गंभीर आहेत, हे अधोरेखित केले.
कोट्यवधींची विकासकामे रखडली- तत्कालीन कौन्सिलचा कालावधी संपल्याने मागील चार वर्षांपासून संगमनेर नगर परिषदेची निवडणूक झालेली नाही आणि कौन्सिल अस्तित्वात नसल्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. कौन्सिल अस्तित्वात असताना तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांची विकासकामे प्रस्तावित करण्यात आली होती. यामध्ये विविध प्रभागांतील रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांची कामे समाविष्ट होती. परंतु, प्रशासकीय राजवट सुरू झाल्यामुळे ही सर्व कामे रखडली आहेत.
प्रशासकीय कालावधीत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाचे धोरण केवळ ‘वेळ मारून नेण्याचे’ असून, त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. यामुळेच संगमनेरकरांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशेचे वातावरण आहे.
डॉ. दानिश खान यांची गांधीगिरी- याच पार्श्वभूमीवर, माजी नगरसेवक डॉ. दानिश खान यांनी त्यांच्या प्रभागातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात आवाज उठवला. लखमीपुरा भागातील रस्ता चार वर्षांपूर्वी मंजूर होऊनही त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. या रस्त्यावरून शाळकरी मुले, रुग्णालयात जाणारे रुग्ण आणि बाजारात ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. खान यांनी गुरुवारी या रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये गुलाबाची रोपे लावून गांधीगिरी आंदोलन केले. त्यांच्या या अभिनव आंदोलनाला प्रभागातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. या आंदोलनामुळे संगमनेर शहरातील रखडलेल्या विकासकामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
संगमनेर शहराची विकासाची गती वाढवण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तातडीने होणे गरजेचे आहे, अशी मागणी या आंदोलनामुळे पुन्हा एकदा जोर धरत आहे.

प्रशासनाला इशारा-

यावेळी बोलताना डॉ. दानिश खान यांनी सांगितले की, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे चार वर्षांपूर्वी हा रस्ता मंजूर करण्यात आला होता. जनतेच्या सोयीसाठी हा रस्ता तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. श्रेय कोणीही घेऊ द्या, पण नागरिकांचे हाल होता कामा नयेत. त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर तातडीने या रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर यापेक्षा मोठे आंदोलन छेडण्यात येईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,221
गांधीगिरी आंदोलन दानिश शेख प्रशासकीय राजवट मूलभूत प्रश्न
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.