Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सांगलीत ‘महाराष्ट्र संस्कृती बचाव’ मोर्चा
राजकारण

गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सांगलीत ‘महाराष्ट्र संस्कृती बचाव’ मोर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर आणि भाजप नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. "असंच बोलत राहा, महाराष्ट्राला तुमची खरी संस्कृती कळू द्या," असे ते म्हणाले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सांगली – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेविरोधात आज सांगलीत ‘महाराष्ट्र संस्कृती बचाव’ मोर्चा काढण्यात आला. जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करताना पडळकर यांनी “जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औलाद आहे असं वाटत नाही” असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी या मोर्चात सहभाग घेतला.

पडळकर यांचे हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, अशी भावना व्यक्त करत अनेक नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर आणि भाजप नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. “असंच बोलत राहा, महाराष्ट्राला तुमची खरी संस्कृती कळू द्या,” असे ते म्हणाले. याशिवाय खासदार निलेश लंके यांनीही पडळकरांवर टीका केली. ते म्हणाले, “आपल्या आमदारांना आवरा, अन्यथा दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात एक दिवस जावे लागेल.” पडळकरांचे आरोप हे राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.

खासदार निलेश लंके यांनी या मोर्चात बोलताना पडळकरांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाठबळ असल्याचा दावा केला. “आजवर कोणीही वैयक्तिक पातळीवर इतकी खालची टीका करत नव्हतं, पण सध्या राजकारणाचा दर्जा घसरत चालला आहे. यावरून राज्यात जातीय दंगली सुरू झाल्या आहेत असे चित्र दिसत आहे,” असे गंभीर विधान लंके यांनी केले.

मोर्चात अनेक दिग्गज नेते सहभागी – हा निषेध मोर्चा पुष्पराज चौकातून सुरू झाला आणि राममंदिर, पंचमुखी मारुती मंदिर, रिसाला रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कापड पेठ मार्गे स्टेशन चौकात पोहोचला, जिथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह खासदार निलेश लंके, धैर्यशील मोहिते, बजरंग सोनवणे, भास्कर भगरे आणि आमदार रोहित पवार, रोहित पाटील, अभिजित पाटील, जितेंद्र आव्हाड, राजू खेर यांसारखे अनेक महत्त्वाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 374
‘महाराष्ट्र संस्कृती बचाव’ मोर्चा गोपीचंद पडळकर जितेंद्र आव्हाड निलेश लंके मोर्चा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे वीज बिल भरले नाही म्हणून रोहित्र…

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.