Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा; दोन्ही गटांतील बेचाळीस जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

02/11/2026

सोमवार ०२ नोव्हेंबर —- आजच्या दिवसाचे राशिभविष्य

02/11/2026

जेव्हा पालकमंत्र्यांच्या हातात क्रिकेटची बॅट येते तेव्हा….

01/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अज्ञात आरोपींनी प्रसाद देण्याच्या बहाण्याने ६० हजार रुपयांच्या दोन अंगठ्या लांबविल्या
गुन्हेगारी

अज्ञात आरोपींनी प्रसाद देण्याच्या बहाण्याने ६० हजार रुपयांच्या दोन अंगठ्या लांबविल्या

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पाटोळे करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/09/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटाजवळ एका ६८ वर्षीय व्यक्तीची मंगळवारी फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रसाद देण्याच्या बहाण्याने अनोळखी इसमांनी एका वृद्धाकडून दोन सोन्याच्या अंगठ्या हातचलाखीने काढून घेतल्या. या अंगठ्यांची अंदाजे किंमत ६०,००० रुपये आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकर विठोबा दिघे (वय ६८, रा. जोर्वे, ता. संगमनेर) हे २३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:०० वाजता त्यांच्या मोटारसायकलवरून बाळेश्वरहून जोर्वे येथे परत येत होते. चंदनापुरी घाटाखालील ढगाडी मंदिराजवळ दोन अनोळखी तरुणांनी त्यांना थांबवले.

या दोन्ही आरोपींनी दिघे यांचा विश्वास संपादन करून, हा प्रसाद देवाला द्या, असे सांगत त्यांच्याकडील सोन्याच्या अंगठ्या प्रसादाला लावण्यासाठी मागितल्या. दिघे यांनी त्यांच्याजवळील प्रत्येकी नऊ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (एक हिरव्या खड्याची आणि दुसरी पांढऱ्या खड्याची) त्यांना दिल्या.

आरोपींनी हातचलाखीने अंगठ्या स्वतःकडे ठेवून त्याऐवजी कागदी पुडीमध्ये दगड बांधून दिघे यांना परत दिल्या. त्यानंतर काही वेळाने दिघे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिघे यांच्या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पाटोळे करत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 826
अंगठ्या चोरी गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा; दोन्ही गटांतील बेचाळीस जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

02/11/2026

दोडक्याच्या पिकात गांजाची शेती; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची धडक कारवाई

01/11/2026

शेतकऱ्याकडे लाच मागणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञावर गुन्हा दाखल

30/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा; दोन्ही गटांतील बेचाळीस जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar02/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात पूर्वकल्पना व प्रशासकीय सूचना झुगारून लोखंडी पोल…

सोमवार ०२ नोव्हेंबर —- आजच्या दिवसाचे राशिभविष्य

02/11/2026

जेव्हा पालकमंत्र्यांच्या हातात क्रिकेटची बॅट येते तेव्हा….

01/11/2026

संगमनेर तालुका कोणाची जहागीरदारी नाही; जनतेने परिवर्तन घडविले: आमदार अमोल खताळ

01/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.