Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलिसांची दमदार कामगिरी : शस्त्र विक्रीसाठी आलेल्या २ आरोपीसह ३ गावठी पिस्टल, १० जिवंत काडतूस, ६ मॅगझिन आणि इर्टिका कारसह तब्बल ‘इतक्या’ लाखाचा मुद्देमाल पकडला
गुन्हेगारी

पोलिसांची दमदार कामगिरी : शस्त्र विक्रीसाठी आलेल्या २ आरोपीसह ३ गावठी पिस्टल, १० जिवंत काडतूस, ६ मॅगझिन आणि इर्टिका कारसह तब्बल ‘इतक्या’ लाखाचा मुद्देमाल पकडला

अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सतीश पठारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 24, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे पथक आणि श्रीरामपूर शहर पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे. अग्नि शस्त्र विक्रीसाठी काही संशयित श्रीरामपूरमध्ये आल्याची माहिती मिळतात या संयुक्त पथकाने कारवाई करत दोघाजणांना पकडले. कारवाईदरम्यान आरोपींकडून ३ गावठी पिस्टल, १० जिवंत काडतूस, ६ मॅगझिन आणि इर्टिका कारसह तब्बल ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका इर्टिका कार मधून दोघेजण शस्त्र विक्रीसाठी घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने संजयनगर रोडवरील मिल्लतनगर येथे पाटाच्या कडेला आरोपींना पकडण्यासाठी सापळा लावला होता. संशयित वाहन तेथून जात असताना पोलिसांनी ते अडविले. वाहनातील दोघा जणांकडे पोलिसांनी चौकशी केली असता तसेच कारची झडती घेतल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.
पोलिसांनी बबलू उर्फ इम्तियाज अजीज शहा (वय ३५, रा. काझीबाबा रोड, बाबपुरा चौक, वार्ड नंबर दोन, श्रीरामपूर ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर) व नदीम खान शाबीर खान (वय ३० वर्ष, रा. नागद रोड, चाळीसगाव, जि. जळगाव या दोघांना ताब्यात घेतले. तसेच कारच्या झडतीमध्ये पोलिसांना तीन अवैध अग्निशस्त्र गावठी पिस्टल, १० जिवंत काडतूस, ६ मॅगझिन, २ मोबाईल व इर्टिका कार असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सतीश पठारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींवर श्रीरामपूर शहर, राहुरी, बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
उपनिरीक्षक रोशन निकम पुढील तपास करत असून ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण, सचिन धनाड, संतोष दरेकर, पोलीस नाईक काका मोरे, अनिल शेंगाळे, रामेश्वर वेताळ, पोलीस कॉन्स्टेबल सतीश पठारे, नितीन शेलार, अजय अंधारे, आरसीपी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेळके, पोलीस कॉन्स्टेबल गायके, भोई, अहिरे, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, रोशन निकम, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे आदींचा समावेश होता.
anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 867
गुन्हेगारी सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

By अनंत पांगारकरAugust 1, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: दलित, शोषितांचा आपल्या साहित्यातून आवाज बुलंद करणारे आणि हक्कांसाठी लढा…

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

July 31, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.