Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुर्दैवी घटना: होरपळून आजी आणि नातवाचा मृत्यू
श्रद्धांजली

दुर्दैवी घटना: होरपळून आजी आणि नातवाचा मृत्यू

या दुर्दैवी घटनेने पंचक्रोशीतील सर्व नागरिक आणि नातेवाईक हळहळले असून, सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील आश्वी जवळील खळी येथील कांगणवाडी येथे एका अत्यंत हृदयद्रावक घटनेत गरम पाणी अंगावर पडून भाजल्याने आजी आणि तिच्या पाच वर्षांच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, सोसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ही दुर्दैवी घटना ८ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. खळी कांगणवाडी येथील रहिवासी श्रीमती सिंधुबाई नामदेव सोसे (वय ५२) आणि तिचा नातू राहुल प्रकाश सोसे (वय ५) अंघोळीसाठी गरम केलेले पाणी वापरत असताना, ते अनावधानाने त्यांच्या अंगावर सांडले.
या अपघातात दोघेही गंभीररित्या भाजले. त्यांच्या शरीराचा सुमारे ६० टक्के भाग भाजला होता, विशेषतः पाठीचा मागील भाग आणि पाय अधिक प्रमाणात भाजले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, कुटुंबियांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.
प्रवरा रुग्णालयात गेले काही दिवस दोघेही मृत्यूशी झुंज देत होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना यश आले नाही. १५ सप्टेंबर रोजी आजी सिंधुबाई सोसे यांचे निधन झाले. त्यानंतर मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी नातू राहुलनेही जगाचा निरोप घेतला. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने सोसे कुटुंबाला आणि खळी गावाला मोठा धक्का बसला आहे.
सोसे कुटुंब हे अत्यंत साधे, कष्टकरी आणि मनमिळाऊ म्हणून ओळखले जाते. या कठीण काळात कांगणवाडीतील सर्व ग्रामस्थांनी सोसे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला. आजच्या काळात माणुसकी अजूनही जिवंत आहे, याचा अनुभव या घटनेतून आला, असे स्थानिकांनी सांगितले.
या दुर्दैवी घटनेने पंचक्रोशीतील सर्व नागरिक आणि नातेवाईक हळहळले असून, सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. सिंधुबाई सोसे यांच्या पश्चात पती नामदेव सोसे, दोन मुलगे, दोन सुना, दोन मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे, तर नातू राहुलच्या पश्चात आई-वडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,207
भाजून मृत्यू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

08/10/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.