Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘आय लव्ह संगमनेर’चा उपक्रम, महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाला रंगत; पैठणीसह बक्षीसांनी भारावल्या महिला!
सामाजिक

‘आय लव्ह संगमनेर’चा उपक्रम, महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाला रंगत; पैठणीसह बक्षीसांनी भारावल्या महिला!

एकंदरीत, या कार्यक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद हा 'आय लव्ह संगमनेर' चळवळीच्या यशाचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीच्यावतीने शहरात नवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाला महिलांनी पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमामुळे महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच आनंददायी मनोरंजनाचा अनुभव मिळाला.

संगमनेरमधील गणेश नगर, महाराणा प्रताप चौक, आदर्श कॉलनी, मालदाड रोड, ऑरेंज कॉर्नर आणि आझाद चौक या भागांमध्ये हा कार्यक्रम बुधवारी रात्री उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रत्येक ठिकाणी महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता, यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता पहिल्याच दिवशी दिसून आली. 

या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. मैथिलीताई तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासोबत ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीच्या महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टीव्हीवरील लाईव्ह कॉन्सर्टप्रमाणे या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. यात राज्यस्तरीय निवेदक राजेश मंचरे, ईश्वरी खैरे, अमोल पानसरे तसेच लयभारीची टीम (गोकुळ राहणे आणि वंदना राहणे) यांनी त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये महिलांसाठी मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते, यात नवऱ्याचे नाव घेणे, गाण्यांच्या भेंड्या, जनरल नॉलेजचे प्रश्न, हास्यविनोद आणि खास ‘खेळ पैठणीचा’ अशा खेळांचा समावेश होता. प्रत्येक ठिकाणी १८ महिलांना राजेशाही पैठणी, कुकर आणि कढई यांसारखी विविध बक्षिसे देण्यात आली. याव्यतिरिक्त, उपस्थित असलेल्या सर्व महिलांना भेट म्हणून शुगर-फ्री डबा देण्यात आला. 

यावेळी बोलताना सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, नवरात्र म्हणजे नारीशक्तीच्या सन्मानाचा उत्सव आहे. या काळात महिला उपवास करतात. भक्ती आणि शक्तीचा संगम म्हणजे नवरात्री. ‘आय लव्ह संगमनेर’च्यावतीने आयोजित हा कार्यक्रम महिलांसाठी अत्यंत आनंददायी ठरत आहे.

डॉ. मैथिलीताई तांबे यांनी ‘आय लव्ह संगमनेर’च्या उद्देशावर प्रकाश टाकत, युवक आणि युवतींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. ‘खेळ पैठणीचा’ सारख्या मनोरंजक कार्यक्रमांमुळे महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळत आहे. हे एक सामाजिक आणि सांस्कृतिक व्यासपीठ असून, सर्वांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. जयश्रीताई थोरात यांनी संगमनेर शहराच्या सांस्कृतिक परंपरेची प्रशंसा करत, लोकनेते राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर व तालुका वैभवशाली ठरला आहे. एक तालुका एक परिवार ही संकल्पना राबवताना सातत्याने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन हे संगमनेर शहराचे वैशिष्ट्य राहिले आहे, असे सांगत, सर्व महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

एकंदरीत, या कार्यक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद हा ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीच्या यशाचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 862
आय लव संगमनेर खेळ पैठणीचा जयश्री थोरात दुर्गाताई तांबे मैथिली तांबे सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.