संगमनेर – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर वैभवशाली आणि सुसंस्कृत ठरले असून, नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिला शक्तीचा सन्मान करण्यासाठी या आठवड्यात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, (२७ सप्टेंबर) आणि रविवारी, (२८ सप्टेंबर) फक्त महिला भगिनींसाठी यशोधन मैदानावर सायंकाळी ७ ते १० या वेळेत मोफत ‘क्लब दांडिया’ होणार आहे.
या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे, रविवारी (२८ सप्टेंबर) ‘देवयानी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री शिवानी सुर्वे दांडिया खेळण्यासाठी महिलांसोबत उपस्थित राहणार आहे. ती सहभागी झालेल्या सर्व महिला व युवतींसोबत स्वतंत्रपणे दांडिया खेळणार आहे.
कुटुंब फाउंडेशन, शिवतांडव प्रतिष्ठान, हिंदुराजा प्रतिष्ठान आणि एकविरा फाउंडेशन यांच्या वतीने यशोधन मैदानावर या ‘क्लब दांडिया’चे आयोजन करण्यात आले आहे.
- २७ सप्टेंबर (शनिवार): नागपूर येथील प्रसिद्ध गरबा नृत्यदिग्दर्शक यश तुमाने हे संगमनेरमधील पहिल्यांदाच गरबा नृत्याचे दिग्दर्शन करणार आहेत.
- २८ सप्टेंबर (रविवार): अभिनेत्री शिवानी सुर्वे उपस्थित राहणार असून, युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात आणि नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे याही महिलांसोबत दांडिया खेळणार आहेत.
दांडिया क्लबसाठी यशोधन मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. पावसाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन १०० x १२० फुटाचा डोम मंडप उभारण्यात आला आहे. याचबरोबर, भव्य स्टेज, एलईडी स्क्रीन, महिलांना दांडिया खेळण्यासाठी भव्य मैदान, आकर्षक लाइटिंग व्यवस्था, सेल्फी पॉईंट आणि रील बनवण्यासाठी खास व्यवस्था अशा अद्ययावत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. सर्व महिला व तरुणींना प्रवेश पूर्णपणे मोफत असणार आहे.
‘आय लव संगमनेर’ चळवळीच्या वतीने शहरात सुरू असलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभत असताना, या क्लब दांडियासाठी देखील जोरदार तयारी करण्यात आली आहे.
शहरातील व तालुक्यातील सर्व महिला आणि तरुणींनी या मोफत क्लब दांडियामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक प्रतीक जाजू, रोहन मुर्तडक व विनायक गरुडकर यांनी केले आहे.
देवयानी फेम शिवानी सुर्वे रविवारी संगमनेरात; यशोधन मैदानावर शनिवार व रविवार ‘महिलांसाठी क्लब दांडिया’
'आय लव संगमनेर' चळवळीच्या वतीने शहरात सुरू असलेल्या 'खेळ पैठणीचा' या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभत असताना, या क्लब दांडियासाठी देखील जोरदार तयारी करण्यात आली आहे.



संगमनेर – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर वैभवशाली आणि सुसंस्कृत ठरले असून, नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिला शक्तीचा सन्मान करण्यासाठी या आठवड्यात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, (२७ सप्टेंबर) आणि रविवारी, (२८ सप्टेंबर) फक्त महिला भगिनींसाठी यशोधन मैदानावर सायंकाळी ७ ते १० या वेळेत मोफत ‘क्लब दांडिया’ होणार आहे.
कुटुंब फाउंडेशन, शिवतांडव प्रतिष्ठान, हिंदुराजा प्रतिष्ठान आणि एकविरा फाउंडेशन यांच्या वतीने
‘आय लव संगमनेर’ चळवळीच्या वतीने