अहिल्यानगर – प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या ते अतिमोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने, अकोले तालुक्यातील निळवंडे धरण परिसरात अत्यंत सतर्कता बाळगण्याचे आवाहन उर्ध्व प्रवरा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी केले आहे.
निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे नदीपात्र व धरणाच्या खालील परिसरातील पाण्याचा वेग व पातळी लक्षणीय वाढणार आहे.
या संभाव्य परिस्थितीमुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना म्हणून, नदीपात्र व जलाशय परिसरात असलेले कोणतेही साहित्य अथवा जनावरे तात्काळ हलविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. तसेच, विसर्गात टप्प्याटप्याने वाढ होण्याची शक्यता असल्याने, धरणाच्या खालील परिसरातील महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायती क्षेत्रांमध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेऊन सज्ज राहावे आणि नागरिकांनी सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता हापसे यांनी केले आहे.
विशेषतः, नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दि. २ ऑक्टोबर रोजी घट विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक नदी, धरण व जलाशय परिसराकडे जातात. या वेळी प्रवाही पाण्याचा वेग व खोली लक्षात न आल्यास जिवितहानी होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन विभागाने केले आहे.
निळवंडे धरण परिसरात अत्यंत सतर्कतेचा इशारा: हवामानाचा अंदाज पाहता मोठ्या विसर्गाची शक्यता, नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी
विशेषतः, नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दि. २ ऑक्टोबर रोजी घट विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक नदी, धरण व जलाशय परिसराकडे जातात. या वेळी प्रवाही पाण्याचा वेग व खोली लक्षात न आल्यास जिवितहानी होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी



अहिल्यानगर – प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या ते अतिमोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने,
या संभाव्य परिस्थितीमुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना म्हणून,

