Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरात 200 विद्यार्थी गांधींच्या वेशभूषेत, 600 विद्यार्थी करणार सामूहिक भजन; जयहिंद लोक चळवळीच्यावतीने भव्य प्रभात फेरीचे आयोजन…
महाराष्ट्र संवाद विशेष

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरात 200 विद्यार्थी गांधींच्या वेशभूषेत, 600 विद्यार्थी करणार सामूहिक भजन; जयहिंद लोक चळवळीच्यावतीने भव्य प्रभात फेरीचे आयोजन…

गुरुवारी सकाळी 8 वाजता प्रभात फेरीला लोकनेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे यशोधन जनसंपर्क कार्यालय येथून सुरुवात होईल. ही फेरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे संगमनेर बस स्थानकावर पोहोचेल.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती

संगमनेर – सत्य, अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने जयहिंद लोक चळवळीच्यावतीने संगमनेर शहरात भव्य प्रभात फेरी आणि सामूहिक भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी, (2 ऑक्टोबर) होणाऱ्या या कार्यक्रमात महात्मा गांधीजी यांची वेशभूषा केलेले 200 विद्यार्थी प्रभात फेरीत सहभागी होणार आहेत, तर विविध शाळांमधील 600 विद्यार्थी सामूहिक भजन सादर करून राष्ट्रपित्यांना आदरांजली वाहतील.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या गांधीजींची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या निमित्ताने, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी माहिती दिली की, गुरुवारी सकाळी 8 वाजता प्रभात फेरीला लोकनेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे यशोधन जनसंपर्क कार्यालय येथून सुरुवात होईल. ही फेरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे संगमनेर बस स्थानकावर पोहोचेल. या प्रभात फेरीत सहभागी होणाऱ्या 200 विद्यार्थ्यांसह महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर आधारित विविध चित्ररथ हे विशेष आकर्षण असणार आहेत.

सकाळी 9 वाजता प्रभात फेरी बस स्थानकावर पोहोचल्यानंतर सामूहिक भजन गायनाचा कार्यक्रम होईल. या भजन कार्यक्रमात विविध शाळांमधील 600 विद्यार्थी महात्मा गांधी यांच्या प्रार्थना गीतांचे सामूहिक गायन करून अभिवादन करतील.

या कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्यासह शहरातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जयहिंद लोक चळवळीच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या प्रभात फेरी व भजन कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 569
गांधी जयंती प्रभात फेरी भजन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.