Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूल, चॉपर आणि जिवंत काडतुसांसह दोघांना अटक, मुख्य सूत्रधार फरार
गुन्हेगारी

पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूल, चॉपर आणि जिवंत काडतुसांसह दोघांना अटक, मुख्य सूत्रधार फरार

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
श्रीरामपूर:
शहरात बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्या दोन सराईतांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, एक धारदार चॉपर आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय व श्रीरामपूर शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने १६ जून २०२६ रोजी संध्याकाळी ही धडक कारवाई केली.
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने जर्मन हॉस्पिटलच्या मागे, पाण्याच्या पाटाजवळ सापळा रचला होता. तिथे संशयास्पदरित्या थांबलेल्या दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता हा बेकायदेशीर हत्यारांचा साठा उघडकीस आला.
या कारवाईत पोलिसांनी नाझीम अन्वर पठाण (वय २५, रा. वॉर्ड नं. २, श्रीरामपूर) याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि रेडमी कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे. तर त्याचा साथीदार मोहम्मद जाफर खुदाबक्ष पटेल (वय १८ वर्ष १ महिना, रा. काझीबाबा रोड, श्रीरामपूर) याच्याकडून ७.६५ एम.एम. चे दोन जिवंत काडतूस, एक धारदार चॉपर आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी ही हत्यारे शाहरुख पटेल (रा. संजयनगर, वॉर्ड क्र. १, श्रीरामपूर) याच्याकडून आणल्याची कबुली दिली. सध्या शाहरुख पटेल फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हे आरोपी हत्यारे कोणाकडून आणत होते, ती कोणाला विकणार होते की त्यांचा घातपाताचा काही वेगळा उद्देश होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ करत आहेत. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल खैरे, पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे आणि त्यांच्या पथकाने केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 653
गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar20/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन आला आहे. कार्यक्षेत्रात…

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.