Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा: मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी सवलती लागू करण्याची घोषणा
राजकारण

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा: मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी सवलती लागू करण्याची घोषणा

पुढील दोन-तीन दिवसांत नुकसानीची सर्व माहिती संकलित झाल्यानंतर खरडलेली जमीन, विहिरी, घरांचे नुकसान यासह तातडीच्या मदतीसाठी सर्वंकष धोरण तयार केले जाईल.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/09/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळाच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (30 सप्टेंबर) केली आहे. यासोबतच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीची मदत आणि दीर्घकालीन उपाययोजना दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकसानीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 60 लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, पहिल्या टप्प्यात 2 हजार 215 कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. ही मदत देण्यासाठी केवायसीच्या अटी शिथिल करून ॲग्री स्ट्रक्चर रेकॉर्डच्या आधारे दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुढील दोन-तीन दिवसांत नुकसानीची सर्व माहिती संकलित झाल्यानंतर खरडलेली जमीन, विहिरी, घरांचे नुकसान यासह तातडीच्या मदतीसाठी सर्वंकष धोरण तयार केले जाईल. दिवाळीपूर्वी सर्व प्रकारची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. यासंदर्भातील सविस्तर घोषणा येत्या आठवड्यात करण्यात येईल.

ओला दुष्काळ हा शब्द मॅन्युअलमध्ये नसला, तरी मंत्रिमंडळाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळाप्रमाणेच टंचाईसदृश परिस्थिती समजून सर्व सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 461
अतिवृष्टी दुष्काळी सवलती देवेंद्र फडणवीस शेतकरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
श्रद्धांजली

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

By Annant Ppangarkar20/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर येथील जेष्ठ पत्रकार विनोद बूब (वय ७८) यांचे रविवारी…

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.