संगमनेर – संगमनेर शहरात बुधवारी (०१ ऑक्टोबर) सकाळी भररस्त्यातून एका ३० वर्षीय विवाहित महिलेचे ‘फिल्मी स्टाईल’ अपहरण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील रंगारगल्लीतील शनी मंदिर ते जाजू पेट्रोल पंप दरम्यान ही घटना घडली असून, घटनेनंतर तातडीने सूत्रे हलवत पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा व अपहृत महिलेचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली आहे. भरदिवसा शहराच्या मध्यभागी ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरपालिकेच्या वतीने रस्त्यांची साफसफाईचे काम करणारी ३० वर्षीय महिला बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिर ते जाजू पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काम करत होती. त्याच वेळी, जिथे रंगारगल्ली परिसर चारचाकी वाहनातून आलेल्या काही तरुणांनी तिला जबरदस्तीने उचलून गाडीत बसवले आणि अपहरण केले.
अपहरणानंतर घाबरलेल्या महिलेने प्रसंगावधान राखत आपल्या पतीला फोन करून या घटनेची माहिती दिली. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी गाडी सुसाट वेगाने रंगारगल्लीतून शहराबाहेर नेल्याचे आणि हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे.
पतीकडून माहिती मिळताच, शहर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. अपहृत महिलेचा मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी अनेक पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना केली आहेत. अपहरणकर्त्यांचा उद्देश खंडणी आहे की अन्य काही, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, अपहरणकर्ते आणि त्यांची गाडी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे अपहरणकर्त्यांचा माग काढणे पोलिसांसाठी सोपे झाले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांकडे अपहरणकर्त्यांना त्वरित अटक करण्याची आणि महिलेला सुखरूप सोडवण्याची मागणी केली आहे.
शहर पोलीस अधिक तपास करत असून लवकरच या गुन्ह्याचा छडा लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संगमनेरात ‘फिल्मी स्टाईल’ विवाहितेचे भरदिवसा अपहरण, दहशतपूर्ण घटना; पतीला फोन करून माहिती दिल्यावर पोलिसांकडून तातडीने शोध सुरू