Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगरमध्ये २९० तरुणांना शासकीय नोकरी: पालकमंत्री डॉ. विखे यांच्या हस्ते ४ ऑक्टोबरला नियुक्तीपत्रे
प्रशासन

अहिल्यानगरमध्ये २९० तरुणांना शासकीय नोकरी: पालकमंत्री डॉ. विखे यांच्या हस्ते ४ ऑक्टोबरला नियुक्तीपत्रे

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते आणि तहसीलदार (महसूल) शरद घोरपडे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/10/2025Updated:02/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील २९० पात्र तरुणांना शासकीय नोकरीची संधी मिळाली आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्व उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले जाणार आहे.

या एकूण २९० नियुक्तींपैकी १८१ जणांना अनुकंपा तत्त्वावर तर १०९ उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) लिपिक पदांसाठी नियुक्ती मिळणार आहे. अनुकंपा तत्त्वावर निवड झालेल्या १८१ उमेदवारांमध्ये गट ‘क’ मधील ६७ आणि गट ‘ड’ मधील ११४ उमेदवारांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यात गती दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेला गती देऊन पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. यामुळे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार असून, दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

अनुकंपा तत्त्वावरील गट ‘क’ व गट ‘ड’ मधील सर्व उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया महसूल विभागाने मागील महिन्यातच पूर्ण केली आहे. पडताळणीनंतर उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार उपलब्ध विभाग व रिक्त जागांवर त्यांची शासकीय नोकरीसाठी शिफारस करण्यात आली आहे. तसेच, MPSC मार्फत शिफारस केलेल्या १०९ उमेदवारांचीही संबंधित विभागांनी कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली आहे.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते आणि तहसीलदार (महसूल) शरद घोरपडे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,263
अहिल्यानगर जिल्हाधिकारी शासकीय नोकरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.