Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नवीन वस्तीगृह आणि ट्रेनिंग सेंटरमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सुविधा, जयहिंद आदिवासी आश्रम शाळेमुळे विद्यार्थ्यांना मोठी संधी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र संवाद विशेष

नवीन वस्तीगृह आणि ट्रेनिंग सेंटरमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सुविधा, जयहिंद आदिवासी आश्रम शाळेमुळे विद्यार्थ्यांना मोठी संधी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

नव्याने होणाऱ्या ट्रेनिंग सेंटरमुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण प्रणाली मिळणार आहे, तर दर्जेदार वस्तीगृहामुळे विद्यार्थ्यांची राहण्याची मोठी सोय होणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने थोर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेली कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रम शाळा आज राज्यातील इतर आश्रम शाळांसाठी एक आदर्श मॉडेल ठरली आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत, ज्यामुळे त्यांना मोठी संधी मिळाली आहे, तसेच नव्याने होत असलेल्या वस्तीगृह आणि ट्रेनिंग सेंटरमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना अधिक चांगली संधी मिळेल, असा विश्वास माजी शिक्षण मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

कोळवाडे येथे जय हिंद आदिवासी आश्रम शाळेचा वर्धापन दिन, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि फादर रॉबर्ट यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या नवीन वस्तीगृह आणि ट्रेनिंग सेंटर इमारतीचे भूमिपूजन देखील करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते, तर व्यासपीठावर सुधाकर जोशी, गणपतराव सांगळे, विष्णुपंत रहाटळ, काशिनाथ गोंदे, मुख्याध्यापक दशरथ वर्पे, के. के. थोरात, शरद नाना थोरात आदींसह स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी गोरगरीब व आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी ही आश्रम शाळा सुरू केली. आज या शाळेतील ६१० हून अधिक विद्यार्थी राज्यभरात विविध मोठ्या पदांवर कार्यरत आहेत, ही संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. आदिवासी व गरीब समाजातील पालकांनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे. शाळेत अत्यंत चांगल्या सुविधा उपलब्ध असून, नव्याने होणाऱ्या ट्रेनिंग सेंटरमुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण प्रणाली मिळणार आहे, तर दर्जेदार वस्तीगृहामुळे विद्यार्थ्यांची राहण्याची मोठी सोय होणार आहे.

माजी आमदार डॉ. तांबे यांनी यावेळी बोलताना, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जयहिंद आदिवासी आश्रम शाळा गुणवत्ता आणि सुविधांच्या बाबतीत राज्यात अग्रेसर ठरली असल्याचे नमूद केले आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी शाळा यापुढेही प्रयत्नशील राहील असे सांगितले. फादर रॉबर्ट यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ग्रामीण विकासाचा मंत्र घेऊन आदिवासी बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपण काम करत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी केले. यावेळी शालेय समितीचे सदस्य, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 546
जयहिंद आदिवासी आश्रम शाळा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.