सोलापूर – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचे मोठे बंधू आणि शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे सकाळी शेतात जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. गंभीर जखमी झालेल्या महेश चिवटे यांना तातडीने करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
महेश चिवटे यांनी या हल्ल्यामागे दिग्विजय बागल आणि रश्मी बागल कोलते यांनी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. दिग्विजय बागल हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून उमेदवार होते, तर रश्मी बागल कोलते या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. या आरोपामुळे सोलापूर जिल्ह्यातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा विकोपाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांमधील वाद यापूर्वीही समोर आला होता.
जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रणजीत माने हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. हल्लेखोर आणि त्यामागील नेमके कारण काय आहे, याचा शोध घेण्यात येत आहे.
अंतर्गत संघर्ष थेट हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने सोलापूरमध्ये तणाव विकोपाला गेला असून, संपूर्ण तपासानंतर या प्रकरणातील सत्य समोर येईल.
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला