Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

27/10/2026

ट्रॅफिक पोलिसांशी झटापट प्रकरण; कारवाईला १४ वर्षानंतर मोठा धक्का! संगमनेरमधील बहुचर्चित प्रकरणात न्यायालयाने दिली क्लिन चिट

27/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने संगमनेरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून ‘दिवाळी शिधा’चे मोठे गिफ्ट

27/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धनादेश अनादरीत करणे आरोपीला भोवले: संगमनेर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
न्यायालय

धनादेश अनादरीत करणे आरोपीला भोवले: संगमनेर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

एक महिना साधा कारावास आणि ४,७३,९०० रुपये एक महिन्याच्या आत फिर्यादीस देण्याचे आदेश दिले. आरोपीने ही रक्कम न दिल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रवरा चिट्स प्रा. लि. कंपनीच्या भिशी व्यवहारात दिलेला धनादेश अनादरीत झाल्याचे सिद्ध झाल्याने संगमनेर येथील कोर्टाने आरोपी सुर्यभान हरीभाउ नाईकवाडी यांना एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावत थकीत रक्कम महिनाभराच्या आत फिर्यादीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

संगमनेरचे ४ थे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. भेंडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. प्रवरा चिट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टचे कलम १३८ नुसार दाखल केलेल्या या खटल्यामध्ये सुर्यभान हरीभाउ नाईकवाडी हे आरोपी होते. आठ वर्षे हा खटला सुरू होता. 

न्यायालयात ॲड. कुलभूषण महाले यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी हा कंपनीच्या भिशी योजनेचा सदस्य होता आणि त्याने दि. १२/०५/२०१३ रोजी भिशीची रक्कम उचलली होती. यानंतर, एप्रिल २०१४ ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत आरोपीने मासिक हप्ते भरले नाहीत. चिट करारानुसार, आरोपीकडे एकूण रु. ४,७३,९००/- (मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज धरून) इतकी रक्कम थकीत होती. ही रक्कम देण्यासाठी आरोपीने दिलेला धनादेश क्र. ७९८७७२ हा ‘फंड्स इनसफिशियंट’ या कारणामुळे दि. ३०/०७/२०१६ रोजी अनादरीत झाला. त्यानंतर कायदेशीर नोटीस देऊनही आरोपीने रक्कम अदा केली नाही.

न्यायालयासमोर चाललेल्या कामकाजामध्ये आरोपीच्या वकिलांनी कोर्टात असा बचाव केला की, कंपनीने भिशीची रक्कम देताना सुरक्षिततेसाठी आरोपीच्या सहीचे १० कोरे धनादेश घेतले होते आणि थकीत नसतानाही अतिरिक्त व्याज वसूल करण्यासाठी त्या कोऱ्या धनादेशाचा गैरवापर करून ही खोटी फिर्याद दाखल केली.

दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, फिर्यादी पक्षाने धनादेश देणे, धनादेश अनादरीत होणे, आणि कायदेशीर नोटीस पाठवणे हे सर्व मुद्दे सिद्ध केल्याचे आढळले. आरोपीने धनादेशावर आपली सही असल्याचे नाकारले नाही, तसेच कायदेशीर कर्ज थकीत असल्याचे फिर्यादीचे वकील कुलभूषण महाले यांनी कोर्टासमोर सिद्ध झाले. यामुळे न्यायालयाने आरोपीला परकाम्य संलेख अधिनियम, कलम १३८ नुसार दोषी ठरवले.

त्यानंतर न्यायाधीश भेंडे यांनी आरोपी सुर्यभान हरीभाउ नाईकवाडी यांना एक महिना साधा कारावास आणि ४,७३,९०० रुपये एक महिन्याच्या आत फिर्यादीस देण्याचे आदेश दिले. आरोपीने ही रक्कम न दिल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,250
कुलभूषण महाले जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ट्रॅफिक पोलिसांशी झटापट प्रकरण; कारवाईला १४ वर्षानंतर मोठा धक्का! संगमनेरमधील बहुचर्चित प्रकरणात न्यायालयाने दिली क्लिन चिट

27/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

By Annant Ppangarkar27/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक…

ट्रॅफिक पोलिसांशी झटापट प्रकरण; कारवाईला १४ वर्षानंतर मोठा धक्का! संगमनेरमधील बहुचर्चित प्रकरणात न्यायालयाने दिली क्लिन चिट

27/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने संगमनेरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून ‘दिवाळी शिधा’चे मोठे गिफ्ट

27/10/2026

मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या आजचे राशीभविष्य

27/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.