Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मेडिकलवर एलसीबीचा छापा; नशेच्या इंजेक्शनच्या ४० सीलबंद बाटल्या जप्त, ३१,३७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हेगारी

मेडिकलवर एलसीबीचा छापा; नशेच्या इंजेक्शनच्या ४० सीलबंद बाटल्या जप्त, ३१,३७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

डमी ग्राहकाला मेडिकलच्या मालकाने नशेच्या बाटलीचा बॉक्स दिल्यानंतर, पोलीस पथक आणि औषध निरीक्षक यांनी तात्काळ मेडिकलवर छापा टाकला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – 

अवैधरित्या नशेचे इंजेक्शन, बाटल्या विकणाऱ्या औषध विक्रेत्यावर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. श्रीरामपूर शहरातील खंडाळा शिवारातील ‘शिव मेडिकल’वर छापा टाकून पोलिसांनी एकूण ३१,३७०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, खंडाळा शिवारातील ‘शिव मेडिकल’चा मालक पंकज चव्हाण (वय २१, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर) हा नशेकरीता वापरल्या जाणाऱ्या बाटल्यांची विक्री करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्या पथकाने औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांना बोलावून घेतले आणि एक डमी ग्राहक तयार करून ‘शिव मेडिकल’मध्ये पाठवले.

डमी ग्राहकाला मेडिकलच्या मालकाने नशेच्या बाटलीचा बॉक्स दिल्यानंतर, पोलीस पथक आणि औषध निरीक्षक यांनी तात्काळ मेडिकलवर छापा टाकला. मेडिकल मालक पंकज राजकुमार चव्हाण याला ताब्यात घेऊन त्याची आणि मेडिकलची झडती घेतली असता, तेथून नशेकरीता वापरल्या जाणाऱ्या ४० सीलबंद बाटल्या संबंधित विक्रीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम असा एकूण ३१,३७०/- रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रमीझराजा रफीक आतार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं. ९१४/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, १२५, २७८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करत आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,182
अहिल्यानगर एलसीबी छापा नशेचे इंजेक्शन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक ३…

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.