Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

27/08/2026

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

26/08/2026

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

26/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर हादरले! शाळेत जाणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीवर बिबट्याचा हल्ला; मानेला गंभीर दुखापत, नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव!
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेर हादरले! शाळेत जाणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीवर बिबट्याचा हल्ला; मानेला गंभीर दुखापत, नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव!

या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्या गळ्याला आणि मानेला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने रक्तस्राव झाला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील डिग्रस-अंभोरे रस्त्यावर सकाळी शाळेत जाणाऱ्या एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची भयानक घटना शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्या मानेला व गळ्याला खोल जखमा झाल्या आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला आणि मुलीचा जीव वाचला.

इयत्ता नववीमध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी सकाळी शाळेत जात होती. डिग्रस गावाजवळ रस्त्यालगतच्या शेतातील गिन्नी गवत व कपाशीच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने थेट तिच्या मानेला चावा घेऊन तिला फरफटत गवतात ओढून नेले.

यावेळी रस्त्याने जात असलेल्या काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि तात्काळ आरडाओरडा करत बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. नागरिकांच्या प्रतिकारामुळे बिबट्या घाबरून पळून गेला.

या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्या गळ्याला आणि मानेला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने रक्तस्राव झाला. नागरिकांनी तिला तातडीने उपचारासाठी संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनरक्षक सुभाष धानापुणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि भक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्याचे निर्देश दिले.

वन विभागाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीवर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना करून परिसर बिबटमुक्त करावा, शाळांना संरक्षण द्यावे आणि त्वरित पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा बिबट मुक्तीसाठी मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी वन विभागाला दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,378
बिबट्या हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हे नैराश्यावरील प्रभावी औषध; संगमनेरमध्ये व्याख्यानमालेचा उत्साहात शुभारंभ

23/08/2026

शिक्षित वस्तीच्या मध्यभागी अंधश्रद्धेचा अघोरी खेळ: संगमनेरमधील घुलेवाडीत तांत्रिक प्रकारांमुळे खळबळ, सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

22/08/2026

कुंभेफळ परिसरात बिबट्याची दहशत: ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला, नागरिकांच्या प्रसंगावधानाने बालकाचे प्राण वाचले

22/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar27/08/20260

आजचे राशीभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन काम सुरू करण्यासाठी…

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

26/08/2026

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

26/08/2026

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला मिळाले हे आंतरराष्ट्रीय मानांकन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन

26/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.