Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राजहंस’ची भरारी: उत्पादक-कामगारांची दिवाळी ‘गोड’, राजहंस दूध संघाकडून ४२ कोटींची भरघोस मदत, संगमनेरच्या बाजारात ‘लक्ष्मी’ आगमन
शेती व सहकार

बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राजहंस’ची भरारी: उत्पादक-कामगारांची दिवाळी ‘गोड’, राजहंस दूध संघाकडून ४२ कोटींची भरघोस मदत, संगमनेरच्या बाजारात ‘लक्ष्मी’ आगमन

रणजितसिंह देशमुख यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली संघाची वाटचाल सातत्याने प्रशंसनीय राहिली आहे. दूध व्यवसाय आता संगमनेर तालुक्याची ओळख बनला आहे. राजहंस दूध संघाने मागील वर्षात ५५०.७०कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांनी प्रेरित आणि माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने यंदाच्या दीपावली सणाच्या तोंडावर दूध उत्पादक आणि कामगारांसाठी मोठा दिलासा दिला आहे. दूध संघाने दूध दर फरक, दुधाचे पेमेंट, अनामत रक्कम, कामगारांचा बोनस आणि मेहनताना, व्यापारी देणे, चढ-उतार निधी अशा विविध बाबींसाठी तब्बल ४१ कोटी रुपये थेट बँकेत वर्ग केले असल्याची माहिती संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिली आहे.

रणजितसिंह देशमुख यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली संघाची वाटचाल सातत्याने प्रशंसनीय राहिली आहे. दूध व्यवसाय आता संगमनेर तालुक्याची ओळख बनला आहे. राजहंस दूध संघाने मागील वर्षात ५५०.७०कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल केली आहे. दूध संघाकडून दरवर्षीप्रमाणेच यंदाही चांगल्या गुणप्रतीच्या दूध पुरवठ्याबद्दल दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध फरक अदा करण्यात आला आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या गुणवत्तेचे कामकाज, शिस्त, काटकसर आणि पारदर्शक कारभार या आदर्श तत्त्वांवर दूध संघाचे कामकाज सुरू आहे. या व्यवसायामुळे तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. राजहंस दूध संघासोबतच अमृत उद्योग समूहातील सर्व शिखर संस्था आणि गावपातळीवरील सहकारी संस्थांमुळे तसेच तालुक्यातील सहकार, दूध व्यवसाय, शिक्षण आणि शेतीमुळे संगमनेर शहराची बाजारपेठ अधिक फुलली आहे.

दरवर्षीप्रमाणे राजहंस दूध संघाकडून दिवाळीच्या निमित्ताने दूध उत्पादक व कामगारांना बोनस अदा करण्यात येत आहे. हे सर्व ४१ कोटी रुपये दिवाळीपूर्वीच बाजारात येत असल्यामुळे शहराच्या बाजारपेठेला एक नवी झळाळी मिळणार आहे. शांत असलेल्या बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, यामुळे व्यापाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार आहे. तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी व कामगारांची यंदाची दिवाळी या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने ‘गोड’ होणार आहे.

राजहंस दूध संघाने तयार केलेले निर्भेळ, स्वच्छ व गुणवत्तापूर्ण पौष्टिक दूध आणि उच्च प्रतीचे उपपदार्थ हे दूध उत्पादकांनी पुरवठा केलेल्या दुधापासून तयार केलेले आहेत. या उत्पादनांना राज्यभर मोठी मागणी आहे. त्यामुळे तालुका, जिल्हा व परिसरातील सर्व शेतकरी, व्यापारी, दूध उत्पादक आणि नोकरदार या सर्वांनी राजहंस दूध संघाच्या दर्जेदार गुणवत्तापूर्ण दूध व उत्पादनांचाच वापर करावा, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

यावेळी व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी तालुक्यातील प्राथमिक सहकारी दूध संस्थांना आवाहन केले की, दूध उत्पादकांना किफायतशीर दूधभाव मिळवून देण्यासाठी संगमनेर दूध संघास स्वच्छ व निर्भेळ दुधाचा पुरवठा करावा.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,190
बाळासाहेब थोरात बोनस रणजीतसिंह देशमुख राजहंस दूध संघ संगमनेर तालुका दूध संघ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.