Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी अंत; दोन महिन्यांत दुसरा बळी, वन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!
महाराष्ट्र संवाद विशेष

बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी अंत; दोन महिन्यांत दुसरा बळी, वन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!

देवठाणमधील बिबट्याची दहशत पाहता, वनविभागाने तातडीने देवठाण आणि परिसरात अधिकाधिक पिंजरे लावून या नरभक्षक बिबट्यास लवकरात लवकर जेरबंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी देवठाण ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
(संग्रह छायाचित्र)
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अकोले – अकोले तालुक्यातील देवठाण येथे एका तीन वर्षीय निरागस मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. कुमारी कविता लहानू गांगड (वय ३) असे या मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे देवठाण आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देवठाण शिवारातील हिवरगाव रस्त्यावर लहानू गांगड यांचे कुटुंब राहते आणि एका शेतकऱ्याकडे ते जमीन वाट्याने कसत आहेत. मंगळवारी सायंकाळी लहानू गांगड हे शेतात गेले होते, तर त्यांची आई घरात होती. घरातून बाहेर अंगणात कविता एकटीच खेळत असताना, सायंकाळी साडेसहा ते पावणेसातच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याने तिला उचलून नेले.

घटनेची माहिती वाऱ्यासारखी देवठाण परिसरात पसरताच नागरिकांमध्ये बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली. स्थानिक नागरिक, कुटुंबातील सदस्य आणि वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी तातडीने रात्री उशिरापर्यंत कविताचा देवठाण परिसरात शोध घेतला. अखेर रात्री उशिरा देवठाण येथील हिवरगाव रस्त्याच्या परिसरात तिचा मृतदेह आढळून आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

पंचायत समितीचे माजी सदस्य आणि देवठाण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अरुण शेळके यांनी या घटनेस दुजोरा दिला. गांगड कुटुंब राहत असलेल्या त्याच परिसरात कविताचा मृतदेह आढळला. रात्री उशिरा तिच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी कोतुळ येथील रुग्णालयात आणले असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन महिन्यांत दुसरा बळी, ग्रामस्थांमध्ये संताप – दरम्यान, देवठाण व परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट आहे. यापूर्वी ३० मे २०२५ रोजी देवठाण गावातील काळे वस्तीवर बिबट्याने हल्ला करून किसनाबाई रामहारी काळे (वय ५७) यांना गंभीर जखमी केले होते. उपचारादरम्यान १५ जून २०२५ रोजी त्यांचे निधन झाले होते. तेव्हा वन विभागाने पिंजरे लावले होते, मात्र त्या बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश आले होते. ही घटना ताजी असतानाच, मंगळवारी सायंकाळी पुन्हा अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याने तीन वर्षीय मुलीला ठार केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

देवठाणमधील बिबट्याची दहशत पाहता, वनविभागाने तातडीने देवठाण आणि परिसरात अधिकाधिक पिंजरे लावून या नरभक्षक बिबट्यास लवकरात लवकर जेरबंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी देवठाण ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,243
बालिका मृत्यू बिबट्या हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026

‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हे नैराश्यावरील प्रभावी औषध; संगमनेरमध्ये व्याख्यानमालेचा उत्साहात शुभारंभ

23/08/2026

शिक्षित वस्तीच्या मध्यभागी अंधश्रद्धेचा अघोरी खेळ: संगमनेरमधील घुलेवाडीत तांत्रिक प्रकारांमुळे खळबळ, सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

22/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर :  छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हा संगमनेर शहरासाठी…

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.