Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वातील कामांना यश: ‘माझी वसुंधरा’चे संगमनेरला १.५ कोटीचे बक्षीस! आ. सत्यजीत तांबेंची माहिती, ‘हा नवा निधी नाही, ज्यांचे योगदान नाही त्यांनी श्रेय घेऊ नये’: प्रकाश कलंत्री; संगमनेरच्या बक्षीसावरून श्रेयवादाचा मुद्दा
राजकारण

दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वातील कामांना यश: ‘माझी वसुंधरा’चे संगमनेरला १.५ कोटीचे बक्षीस! आ. सत्यजीत तांबेंची माहिती, ‘हा नवा निधी नाही, ज्यांचे योगदान नाही त्यांनी श्रेय घेऊ नये’: प्रकाश कलंत्री; संगमनेरच्या बक्षीसावरून श्रेयवादाचा मुद्दा

प्रकाश कलंत्री यांनी म्हटले आहे की, 'हा नव्याने दिलेला निधी नाही, तर 'माझी वसुंधरा' योजनेतील बक्षीस रक्कम आहे. ज्यांचे कोणतेही योगदान नाही, अशा कोणीही या बक्षीस रकमेचे श्रेय घेऊ नये.' या बक्षीसातून विकास कामे मार्गी लागणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/10/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतशील व वैभवशाली असलेले संगमनेर शहर राज्यातील विकसित शहर म्हणून ओळखले जाते. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने केलेल्या विविध पर्यावरणपूरक व स्वच्छता कामांमुळे ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत संगमनेर नगरपरिषदेला १.५ कोटींचा निधी (बक्षीस) मंजूर झाला आहे. या बक्षीस रकमेतून विविध पर्यावरणपूरक विकास कामे मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या ‘माझी वसुंधरा ४.०’ अंतर्गत पर्यावरणीय कामाबद्दल संगमनेर नगर परिषदेला हे १.५ कोटींचे बक्षीस मिळाले आहे. या बक्षीस रकमेतून शहरात महत्त्वपूर्ण विकासकामे मार्गी लावता येणार आहेत. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी ‘स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेर’ ही संकल्पना नागरिकांच्या सहकार्यातून अत्यंत प्रभावीपणे राबवली आणि संगमनेरला स्वच्छ व सुंदर बनवले. लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून विविध विकासाच्या योजना शहरात मार्गी लागल्या आहेत.

नगरपरिषदेच्या चांगल्या कामांची दखल घेऊन यापूर्वीही राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार नगर परिषदेला मिळाले आहेत. ‘माझी वसुंधरा ४.०’ योजनेतून मिळालेल्या या बक्षीस रकमेतून शहरात पर्यावरणपूरक प्रकल्प, हरितपट्टा विकास, घनकचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन यांसारखी विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत.

बक्षीसातून मिळणाऱ्या निधीअंतर्गत होणारी प्रमुख कामे- वृक्षारोपण व गार्डन विकास अभियान: हनुमान मंदिर, सावित्रीबाई फुले गार्डन, चैतन्य नगर गार्डन, गोविंद नगर, अकोले बायपास, श्रमपरिहार सोसायटी, नेहरू गार्डन, पुनर्वसन कॉलनी, राजापूर रोड, सुयोग कॉलनी, संत गाडगेबाबा गार्डन, ऑरेंज कॉर्नर, दुर्गा गार्डन, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल आणि अभिनव नगर या ठिकाणी वृक्षारोपण व गार्डन विकास अभियान राबविण्यात येणार आहे.

मियावाकी प्रकल्प: कोर्टाच्या मागे, घोडेकर मळा, पुनर्वसन कॉलनी, जिजामाता रोड, पावबाकी रोड आणि इतर ठिकाणी ‘मियावाकी’ (दाट जंगल निर्मिती) प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

ऑन ग्रीड सौर ऊर्जा प्रकल्प: कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे ऑन ग्रीड सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

जनजागृती अभियान: या निधीअंतर्गत पर्यावरणविषयक माहिती व जनजागृती अभियान सुद्धा शहरात राबविण्यात येणार आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेने केलेल्या सातत्यपूर्ण पर्यावरणपूरक व संवर्धनाच्या कामामुळे हे बक्षीस मिळाले आहे. या बक्षीस निधीतून शहरात इतर कामे मार्गी लागणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


‘हा बक्षिसाचा पैसा, नवा निधी नाही. ज्यांचे योगदान नाही, त्यांनी श्रेय घेऊ नये.’ – माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी राबवलेल्या ‘स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर’ व ‘हरित संगमनेर’ या उपक्रमाला संगमनेरमधील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. याच माध्यमातून नगर परिषदेला राज्य व राष्ट्रीय पातळीवर सातत्याने विविध पुरस्कार मिळाले आहेत.

व्यापारी प्रकाश कलंत्री यांनी म्हटले आहे की, ‘हा नव्याने दिलेला निधी नाही, तर ‘माझी वसुंधरा’ योजनेतील बक्षीस रक्कम आहे. ज्यांचे कोणतेही योगदान नाही, अशा कोणीही या बक्षीस रकमेचे श्रेय घेऊ नये.’ या बक्षीसातून विकास कामे मार्गी लागणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,195
प्रकाश कलंत्री बक्षीस माझी वसुंधरा संगमनेर नगरपरिषद सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.