Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक-पुणे महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल; तात्काळ टोलमाफी द्या आणि रेल्वे प्रकल्पाला गती द्या – आ. तांबे
सामाजिक

नाशिक-पुणे महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल; तात्काळ टोलमाफी द्या आणि रेल्वे प्रकल्पाला गती द्या – आ. तांबे

या संपूर्ण भागाचे अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण पूर्णपणे बदलण्याची मोठी ताकद या रेल्वे महामार्गामध्ये आहे, असे तांबे यांनी स्पष्ट केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – नाशिक-पुणे महामार्गाची दुरवस्था सण-उत्सवाच्या काळात प्रवाशांसाठी ‘विकतचे दुखणे’ ठरत आहे. टोल भरूनही खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार सत्यजित तांबे यांनी महामार्गाची समस्या आणि सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत, प्रवाशांना भेडसावणारा फटका तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.

दीपावलीसारख्या महत्त्वाच्या सणासुदीच्या दिवसांत पुण्यात किंवा मुंबईत राहणारे संगमनेरकर किंवा नाशिककर याच महामार्गाचा वापर करतात. इतकेच नव्हे, तर समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबारला जाणारे लोक देखील याच महत्त्वाच्या महामार्गाने जात आहेत. मात्र, आज या महामार्गाची परिस्थिती अत्यंत बिकट असून, टोल भरूनही प्रवाशांना खड्ड्यांच्या रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे, यामुळे आठ ते नऊ तास वाहतूक कोंडीत फसावे लागत आहे. लोक वैतागले आणि त्रस्त झाले आहेत, तरीही घराकडे जाण्याच्या ओढीने ते हे हाल सहन करत आहेत, अशी खंत आमदार तांबे यांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर आमदार तांबे यांनी शासनाकडे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे, जोपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल तात्काळ बंद करण्यात यावा किंवा टोलमाफी देण्यात यावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प झाला असता तर आज लोकांचे हे हाल झाले नसते, हे लक्षात घेऊन नाशिक-पुणे हाय स्पीड रेल्वेमार्गाचे काम तातडीने सुरू करणे आवश्यक आहे.

या रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी मागील पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत या महामार्गावरील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक घेण्यात आली होती, तसेच रेल्वे मंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय झाला होता, मात्र त्यानंतर काहीच झाले नाही. म्हणून, आता लोकप्रतिनिधींसोबतच नागरिकांनी रस्त्यावर येऊन जनआंदोलन करावे आणि आवाज उठवावा, असे आवाहन तांबे यांनी केले आहे.

हा रेल्वे मार्ग झाल्यास नाशिक आणि पुण्याच्या मधल्या सर्व गावांना इतका मोठा फायदा होईल की, या संपूर्ण भागाचे अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण पूर्णपणे बदलण्याची मोठी ताकद या रेल्वे महामार्गामध्ये आहे, असे तांबे यांनी स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 424
टोल टोल माफी नाशिक पुणे महामार्ग नाशिक पुणे रेल्वे नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.