Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

27/08/2026

आज गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

27/08/2026

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

26/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘सभागृहा’ची प्रतीक्षा संपली! आमदार सत्यजीत तांबेंमुळे संगमनेरच्या नाभिक समाजाला १० लाखांचा निधी मंजूर
राजकारण

‘सभागृहा’ची प्रतीक्षा संपली! आमदार सत्यजीत तांबेंमुळे संगमनेरच्या नाभिक समाजाला १० लाखांचा निधी मंजूर

याशिवाय राहुरीच्या टाकळीमिया येथील विद्यावर्धिनी ग्रामीण शिक्षण संस्थेला स्कूलबस खरेदी करण्यासाठी देखील वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे,
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील नाभिक समाजाची अनेक दिवसांपासूनची ‘सभागृहाची’ मागणी आता पूर्णत्वास आली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या अथक पाठपुराव्यामुळे अखेर नाभिक समाजाच्या सभागृह बांधकामासाठी १० लाख रुपयांचा महत्त्वपूर्ण निधी मंजूर झाला आहे, याशिवाय राहुरीच्या टाकळीमिया येथील विद्यावर्धिनी ग्रामीण शिक्षण संस्थेला स्कूलबस खरेदी करण्यासाठी देखील वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निर्णयामुळे नाभिक समाजात आनंदाचे वातावरण आहे.

संगमनेर तालुक्यातील नाभिक समाज हा आपल्या मेहनती आणि सामाजिक सक्रियतेमुळे ओळखला जातो. समाजाच्या या मूलभूत गरजेची जाणीव ठेवून आमदार तांबे यांनी निधी मंजुरीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून १० लाख रुपयांचा निधी सभागृह बांधकामासाठी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीतून साकारणारे सभागृह नाभिक समाजासाठी एक महत्त्वाचा आधार ठरणार आहे. समाजाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांसाठी एक सशक्त आणि सुसज्ज मंच या माध्यमातून उपलब्ध होईल. या सभागृहाचा उपयोग प्रामुख्याने युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे, करिअर कार्यशाळा, महिला मंडळांचे कार्यक्रम आणि बचत गटांच्या बैठका, सांस्कृतिक परंपरा, सण-उत्सव जोपासण्यासाठी व्यासपीठ तसेच शैक्षणिक आणि सामाजिक बैठकांचे आयोजन करण्यासाठी होणार आहे.

या निर्णयामुळे समाजाच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि सामुदायिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. निधी मंजूर झाल्याबद्दल संगमनेर तालुक्यातील नाभिक समाजाने आमदार सत्यजीत तांबे यांचे आभार मानले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 689
नाभिक समाज निधी मंजूर सत्यजित तांबे सभागृह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेरचा ईद ए मिलाद जुलूस शांततेत पार; आयोजक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक!

By Annant Ppangarkar27/08/20260

संगमनेर | मोहसीन शेख –   ईद-ए-मिलाद निमित्ताने बुधवारी (२६ ऑगस्ट) संगमनेर शहरात काढण्यात आलेला ईद…

आज गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

27/08/2026

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

26/08/2026

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

26/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.